smart city panjim Dainik Gomantak
गोवा

Panjim Smart City: पणजी स्मार्ट सिटी केवळ नामधारी..!

अस्थाव्यस्थ सर्वत्र असलेल्या या तारा पणजीच्या सौंदर्यात तर बाधा आणतात यात शंकाच नाही

दैनिक गोमन्तक

पणजी: राजधानी पणजी ही देशातील स्मार्टसिटींपैकी एक आहे मात्र नाव मोठे आणि लक्षण छोटे अशी अवस्था सध्या पणजी शहराची करून ठेवली आहे. एक ना धड अन् भाराभर चिंध्या असा प्रकार सर्वत्र पाहायला मिळतोय. नियोजनाअभावी सर्वत्र चालले खोदकम, तुंबणारी गटारे, आणि कचरा हे प्रश्‍न सोडविण्यास आणखी किती वर्षे जातील हे माहित नाही मात्र शहरात सर्वत्र लटकाणारा टेलिफोन, इंटरनेटच्या तारा (वायरी) तरी निश्‍चितपणे महानगरपालिका नियोजित करू शकतात.

(smart city panjim)

अस्थाव्यस्थ सर्वत्र असलेल्या या तारा पणजीच्या सौंदर्यात तर बाधा आणतात यात शंकाच नाही मात्र या तारा सर्वसामान्य नागरिकांच्या अनुषंगाने देखील धोक्याच्या ठरत आहेत त्यामुळे त्या तारांचे योग्य नियोजन करणे गरजेचे आहे.

गुरफटलेले वीज खांब व सिग्नल

शहरपरिसरातील वाहतुक सिग्नल, वीजेचे खांब यांवर या तारांचे झाळे परसलेले आहे. अनेक तारा या खांबाना गुंडाळेल्या आहेत तर काही खांबांवर मोठ-मोठे तारांचे बंडलच बांधून ठेवले आहेत अनेक ठिकाणी. या खांबांना या गुरफटल्याने तसेच तसेच रसत्यावर या तारा पडलेल्या आहेत त्यामुळे अनेकदा फुटपाथावरून चालताना अनेक पदचारीच्या पायात या तारा अडकतात याचा अधिक त्रास प्रामुख्याने जेष्ठ नागरिकांना अधिक प्रमाणात होतो. त्यामुळे महानगरपालिका तसेच संबंधित अधिकाऱ्यांनी यात लक्ष घालून लवकरात लवकर हा प्रश्‍न सोडवावा अशी मागणी पणजीतील नागरिकांद्वारे करण्यात येत आहे.

जंक्शन बॉक्स

इंटरनेट आजच्या युगात सर्वांसाठी महत्त्वाचा आहे मात्र अशाप्रकारे अस्थाव्यस्त तारा जोडणे, एका वीज खांबावर तीन-चार इंटरनेट जंक्शन बॉक्स लटकत ठेवणे हे कितपत योग्य आहे. यासाठी महानगरपालिकेद्वारे योग्य नियोजन करणे गरजेचे आहे अन्यथा या तारांच्या गुरफड्यात पणजी केव्हा गुरफडून गेली हे समजणार नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

PSI Recruitment Goa: महिला 'पीएसआय' भरतीत मोठी गळती, उमेदवार नाराज; 216 पैकी केवळ 13 उमेदवार पात्र, नियम बदलाचा फटका

British Nationals Death In Goa: एक महिन्यात कांदोळीत तीन ब्रिटिश नागरिकांचा मृत्यू

Bank Loan: 181 कोटींची कर्जे थकित, बँकांकडून पाच वर्षांत घेतली 43,103 कोटींची कर्जे

E Challan Cyber Fraud: बनावट 'ई-चलन', सायबर भामट्यांचा नवा सापळा! वाहतूक विभागाकडून सतर्क राहण्याचे आवाहन

Fishing Boat Missing: भरकटलेल्या मच्छिमारांचा अखेर 12 तासांनंतर शोध, चारही जण सुखरूप तळपण जेटीवर

SCROLL FOR NEXT