Panaji Shigmotsav 2023
Panaji Shigmotsav 2023 Dainik Gomantak
गोवा

Goa Shigmotsav 2023 : ‘घणचे कटर घण’ ‘ओस्सय ओस्सय’ने पणजी दुमदुमली

दैनिक गोमन्तक डिजिटल

गोमंतकीय लोकसंस्कृती, लोककला, लोकपरंपरेचा आविष्कार घडविणाऱ्या शिगमोत्सव मिरवणुकीला ‘घणचे कटर घण’ निनादात आणि ‘ओस्सय...ओस्सय’च्या गजरात राजधानी पणजीत थाटात सुरुवात झाली. हजारो प्रेक्षकांनी रोमटामेळ पथकांचे नृत्य, विविध कलाकारांची वेशभूषा तसेच आकर्षक चित्ररथ पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा मोठी गर्दी केली होती.

देशी तसेच विदेशी पर्यटकांचीही उपस्थिती लक्षणीय होती. उत्साहाने जमलेल्या प्रेक्षकांचा हिरमोड होऊ नये, यासाठी आयोजकांनी 10 नंतरही उशिरापर्यंत मिरवणूक सुरू ठेवली होती.

यावेळी केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, पर्यटनमंत्री रोहन खंवटे, भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, शिगमोत्सव समितीचे अध्यक्ष श्रीनिवास धेंपो, कार्याध्यक्ष मंगलदास नाईक व इतर पदाधिकाऱ्यांसह पणजीवासीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांचीही भाषणे झाली.

शिगमोत्सव समितीद्वारे मिरवणूक 10 पूर्वी वेळेत संपविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. पोलिस यंत्रणेने देखील आटोकाट प्रयत्न केले. परंतु नागरिकांचा प्रचंड जनसागर मिरवणूक पाहण्यासाठी उसळल्याने आयोजकांना नियोजित वेळेत कार्यक्रम संपविणे अशक्य झाले.

मिरवणूक पाहण्यासाठी लांबून आलेल्यांच्या उत्साहावर विरजण पाडणेही कठीण होत असल्याने 10 नंतरही मिरवणूक सुरू ठेवण्याशिवाय गत्यंतर नव्हते.

रोमटामेळ पथकांद्वारे सुरूवात

शिगमोत्सव मिरवणुकीची सुरूवात जगदंब रोमटामेळ पथकाद्वारे करण्यात आली. त्यानंतर 7 वा.पर्यंत विविध रोमटामेळ पथके, वेशभूषा कलाकारांनी आपली कला सादर केली. विविध वेशभूषेत सहभागी झालेले बालकलाकर मिरवणुकीचे आकर्षण ठरले.

चित्ररथ ठरले आकर्षण

राम-रावण युद्ध, हनुमान, मगरीवर बसलेला राक्षस, श्रीविष्णू, महादेव आदींवर आधारित विविधांगी चित्ररथ शिगमोत्सव मिरवणुकीचे आकर्षण ठरले. चित्ररथांनी शिगमोत्सवाचा आनंद वृध्दींगत केला.

वीरभद्र लक्षवेधी

शिगमोत्सवात सादर करण्यात आलेल्या वेशभूषांमध्ये कांतारा चित्रपटातील पंजुरलीची भूमिका बहुतांश कलाकारांनी सादर केली होती. अर्धनारी नटेश्‍वर, राम-सीता, साईबाबा, श्री गणपती, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वेशभूषेसह वीरभद्र सादर करणारा चिमुकला सर्वांचे लक्ष वेधून घेत होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa 11th Admission: अवाजवी शुल्क आकारल्यास तात्काळ कारवाई; CM सावंत यांचा विद्यालयांना इशारा

Yellow Alert In Goa: गोव्यात यलो अलर्ट, पुढील दोन दिवस महत्वाचे

Goa Drugs Case: इवल्याशा गोव्यात ड्रग्जचा सुळसुळाट; 3.8 कोटींचे अमली पदार्थ जप्त

Goa Crime News: समाज कल्याण खात्याचे मंत्री फळदेसाईंना धमकी, 20 कोटी खंडणीची मागणी; संशयिताला जामीन

पेरु देशाचा मोठा निर्णय! ट्रान्स लोकांना केले 'मानसिक रुग्ण' घोषित; सरकार देणार मोफत उपचार

SCROLL FOR NEXT