Santinez Footpath Damage Dainik Gomantak
गोवा

Santinez Footpath Damage: स्मार्ट सिटीच्या रस्त्यालगत खोदलेले पदपथ ‘जैसे थे’; जलवाहिनी जोडणी झाली, मात्र खड्डे न बुजवल्याने पादचाऱ्यांना धोका

Santinez Footpath Damage Panaji: इमेजिन पणजी स्मार्ट सिटी डेव्हल्पमेंट लिमिटेडतर्फे (आयपीएससीडीएल) सांतिनेजमध्ये रस्ते काँक्रिटीकरण केले, त्याशिवाय बाजूला पेव्हर्स घालून पदपथाची निर्मिती केली गेली.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: इमेजिन पणजी स्मार्ट सिटी डेव्हल्पमेंट लिमिटेडतर्फे (आयपीएससीडीएल) सांतिनेजमध्ये रस्ते काँक्रिटीकरण केले, त्याशिवाय बाजूला पेव्हर्स घालून पदपथाची निर्मिती केली गेली. या पदपथांची काही आठवड्यांपूर्वी जलवाहिनींची गळती काढण्यासाठी, जोडणी केलेले खोदकाम अद्याप तसेच आहे. त्यामुळे हे खड्डे बुजवण्याचे नक्की काम कोण करणार? असा प्रश्न स्थानिकांना पडला आहे.

सांतिनेजमध्ये वेलनेस मेडिकल ते अग्निशमन दल मुख्यालय या मार्गाच्या दोन्ही बाजूला घरगुती जलवाहिन्या जोडण्याच्या कामासाठी पदपथाखालील मुख्य वाहिनीचा भाग खोदण्यात आला आहे. जोडण्याचे काम झाले आहे, तरी खड्डे काही बुजवलेले नाहीत. तर दुसऱ्या बाजूला नेमके कशासाठी खड्डा खोदला आहे, हेच काही कळत नाही. पदपथ खोदकाम करून तसेच ठेवले असल्याने ये-जा करणाऱ्या पादचाऱ्यांना ते खड्डे धोकादायक ठरत आहेत. रात्रीच्यावेळी हे खड्डे दिसेनासे होतात.

‘तक्रार करावी तरी कोणाकडे?’

स्मार्ट सिटीची कामे करणाऱ्या आयपीएससीडीएलने अद्याप हा भाग महानगरपालिकेकडे वर्ग केलेला नाही. त्यामुळे आयपीएससीडीएललाच या सर्व भागावर लक्ष ठेवावे लागत आहे, परंतु आयपीएससीडीएलचे अभियंते नेमके काय करतात, हे नक्की कळत नाही. तयार केलेले पदपथ खोदकाम करून तसेच ठेवणे योग्य नाही. अशा प्रकाराबाबत नक्की विचारणा कोणाकडे करावी किंवा कोणाकडे तक्रार नोंदवावी, असे प्रश्न येथील व्यवसायिकांना पडलेले आहेत.

वाहिनीतील गॅस गळती रोखण्याचे काम सुरूच

सांतिनेजमधील मधुबन कॉलनीसमोर चार दिवसांपूर्वी गॅस गळती झालेली भूमिगत वाहि नीच्या दुरुस्तीचे काम आज संबंधित कंपनीने हाती घेतले. त्यासाठी जेसीबीच्या मदतीने गॅसवाहिनीचा भाग खोदून काढावा लागला होता. गुरुवारी सायंकाळी पावणेसातच्या सुमारास सांतीनेजमधील मधुबन कॉलनीसमोर गटारामधून गेलेल्या घरगुती गॅस वाहिनीला गळती लागली. त्यामुळे गटारातून वर ज्वाळा दिसत होत्या. स्थानिकांनी अग्निशामक दलास याबाबत माहिती दिली. त्यानंतर येथील गॅस पुरवठा बंद केला होता. वाहिनीची पूर्णपणे दुरुस्ती होऊ शकली नसल्याने आज ते काम हाती घेण्यात आले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: लग्नाचे आमिष दाखवून बलात्काराचा आरोप; 90 लाखांचे दागिने-रोकड घेतल्याप्रकरणी खटला सत्र न्यायालयाकडे वर्ग

Investment Fraud: 20.83 कोटींच्या गुंतवणूक घोटाळ्याला नवे वळण; सुनावणीला गैरहजर राहिल्याने सुनीता रॉड्रिग्जविरुद्ध अटक वॉरंट

Asian Games 2026: एशियन गेम्समध्ये भारताचा धमाका! नेमबाजांची एकाच दिवशी पदकांची बरसात; सुचिका तरियालने रचला नवा इतिहास

Babar Azam Captaincy: 'कॅप्टन्सी सोड अन्...!', वसीम अकरमने बाबर आझमची काढली खरडपट्टी; इंग्लंडविरुद्धचा पराभव पाकिस्तानच्या जिव्हारी

Bicholim Lift Problem: शिवाजी महाराज संकुलातील दोन्ही 'लिफ्ट' वर्षभरापासून बंद; डिचोलीतील नागरिकांची गैरसोय, ज्येष्ठांची तर मोठी परवड

SCROLL FOR NEXT