Panaji Road
Panaji Road Dainik Gomantak
गोवा

Panaji Road : तीन मुख्य मार्गांचे काम पावसाळ्यानंतर; अधिकाऱ्यांची माहिती

गोमन्तक डिजिटल टीम

Panaji Road :

पणजी, पणजी शहरातील मुख्य असणाऱ्या एमजी (महात्मा गांधी), १८ जून व आत्माराम बोरकर मार्गाचे स्मार्ट सिटी मिशनअंतर्गत करावयाचे स्मार्ट रस्ता निर्मितीचे काम पावसाळ्यानंतर केले जाणार असल्याची माहिती इमेजिन पणजी स्मार्ट सिटी लिमिटेडच्या (आयपीएससीडीएल) अधिकाऱ्यांनी दिली.

आयपीएससीडीएल मुदतीपूर्वी म्हणजेच ३१ मेपूर्वी सांतिनेजमधील काँक्रीटीकरण केलेला रस्ता मंगळवार, ता. २८ रोजी रात्री नऊ वाजता वाहतुकीसाठी खुला करणार आहे. त्याशिवाय आता आयपीएससीडीएलने उद्या, ता. २७ रोजी दादा वैद्य मार्गावरील उर्वरित टप्प्यातील महालक्ष्मी मंदिर ते सिंगबाळ बुक स्टोअर हा रस्ता सायंकाळी ७ वाजता वाहतुकीस खुला केला जाणार आहे.

सांतिनेजमधील रस्ता खुला होण्यापूर्वी मंगळवारी सायंकाळी ७ वाजता अल्फ्रान प्लाझा ते ओरियन बिल्डिंगपर्यंतचा आणि गीता बेकरी समोरील वूडलँड स्टोअर-गीता बेकरी आणि सरकारी प्रिंटिंग प्रेस असा ‘सी` आकाराचा रस्ता वाहतुकीस खुला होणार आहे.

मळ्यातील रस्ते आणि मलनिस्सारण मॅनहोलची कामे कधी होणार हा प्रश्‍न आहे. आल्तिनो-भाटले रस्ता चारचाकी वाहनांसाठी बंद असल्याने सध्या या मार्गावर नित्याची वाहतूक कोंडी होत असते. शहरातील मुख्य एमजी रोड, १८ जून मार्ग आणि आत्माराम बोरकर मार्गासह काही मुख्य जोड रस्ते, बाजारातील रस्त्यांचे काम पावसाळ्यानंतर करावे लागण्याची शक्यता आयपीएससीडीएलच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

मुख्यमंत्री काय उत्तर देणार?

काकुलो मॉल ते एसटीपीपर्यंतचा रस्ता ७ जूनपर्यंत करण्यात येणार असल्याचे यापूर्वीच आयपीएससीडीएलने जाहीर केले आहे. त्यामुळे काही कामे ३१ मेपूर्वी पूर्ण झाली आहेत. तर अनेक कामे पावसाळ्यानंतर होतील हे स्पष्ट आहे. मुख्यमंत्री सावंत यांनी ३१ मे ही स्मार्ट सिटीच्या कामांची डेडलाईन दिली होती.

४ दिवसांत जेवढी कामे करता येतील, तेवढी आयपीएससीडीएल मार्गी लावेल. परंतु कामे वेळेत पूर्ण न झाल्यास त्यावर मुख्यमंत्री काय उत्तर देणार, याकडे पणजीकरांचेच नाहीतर राज्यातील सर्व जनतेचे लक्ष लागलेले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

FDA Goa: म्हापशात 510 किलो पनीरसह कांदा जप्त; एफडीएकडून दुसऱ्यांदा कारवाई

Goa Crime: कौटुंबिक वादातून महिलेने उचललं मोठ पाऊल; पोटच्या मुलांना फिनाईल पाजत केला आत्महत्येचा प्रयत्न

Mormugao Sada: सडा परिसरात लवकरच उभे राहणार प्राथमिक आरोग्य केंद्र; मुख्यमंत्री सावंत

FC Goa: नुवेच्या रॉलिन बोर्जिस याच्याशी एफसी गोवाचा कायमस्वरुपी करार, अनुभवाचा होणार फायदा

Goa Today's Live News: गोव्याच्या विनाशावर भाजपचे मौन; युरी आलेमाव

SCROLL FOR NEXT