Goa School : राज्‍यातील शाळा ४ जूनपासून सुरू : शिक्षण संचालक शैलेश झिंगडे

Goa School : यावर्षी अनुदानित शाळांकडून होणाऱ्या शैक्षणिक शुल्क आकारणीचा विषय चव्हाट्यावर आला होता.
Goa School
Goa School Dainik Gomantak

Goa School :

पणजी, राज्यातील २०२४-२५ या शैक्षणिक वर्षाला ४ जूनपासून सुरूवात होत आहे. त्‍यामुळे राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेतर्फे (एनसीईआरटी) सोमवार, ता. २७ मेपासून क्रमिक पाठ्यपुस्तकांचे शाळांना वितरण करण्‍यात येईल, अशी माहिती शिक्षण संचालक शैलेश झिंगडे यांनी दिली.

यंदाच्या शैक्षणिक वर्षांत नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची (एनईपी) नववीसाठी अंमलबजावणी होणार आहे. त्यामुळे या वर्गातील विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी हे वर्ष त्यांची परीक्षा घेणारे ठरणार आहे. शिक्षण संचालनालयाने २०२७-२८ पर्यंत एनईपी पूर्णत: लागू करण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यानुसार संचालनालयाने आराखडाही तयार केला आहे.

Goa School
Thunderstorm In Goa: न्हावेली-साखळीला चक्रीवादळाचा तडाखा, मुख्यमंत्र्यांनी केली पडझडीची पाहणी

यावर्षी अनुदानित शाळांकडून होणाऱ्या शैक्षणिक शुल्क आकारणीचा विषय चव्हाट्यावर आला होता. त्‍यावर शिक्षण संचालनालयाने शाळा व्यवस्थापनांना कारणे दाखवा नोटिसा बजावल्याने व्यवस्थापनांनी अत्यंत हळुवार पावले टाकण्यास सुरुवात केली आहे.

अनेक नामवंत शाळांनी आपली प्रवेश प्रक्रियाच पुढे ढकलली आहे. त्यामुळे आता जूनमध्ये शुल्क आकारणी करून प्रवेश प्रक्रिया होणार काय? सर्वांचे लक्ष असणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com