Fastest Lady Driver: '..पीछे छोड दे सारा जहाँ'! गोव्याची ‘फास्टेस्ट लेडी ड्रायव्हर’ अश्रफी; मोटरस्पोर्ट्‌समधील प्रेरणादायी नाव

Fastest Lady Driver Ashrafi Gaikwad Goa: गोव्याची वेगवान महिला ऑटोक्रॉस चालक म्हणून देशविदेशातील विविध स्पर्धांत आपली छाप सोडणारी अश्रफी गायकवाड सध्या चर्चेत आहे.
Fastest Lady Driver Ashrafi Gaikwad Goa
Fastest Lady Driver Ashrafi Gaikwad GoaDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गोव्याची वेगवान महिला ऑटोक्रॉस चालक म्हणून देशविदेशातील विविध स्पर्धांत आपली छाप सोडणारी अश्रफी गायकवाड सध्या चर्चेत आहे. नुकत्याच कर्नाटकात झालेल्या स्पर्धेत तिने ‘फास्टेस्ट लेडी ड्रायव्हर’ हा किताब पटकावत गोव्याचे नाव उज्ज्वल केले.

आतापर्यंत २५ हून अधिक ऑटोक्रॉस रेसिंग स्पर्धांमध्ये सहभागी झालेल्या अश्रफीने मोटारस्पोर्ट्‌स क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. देशातील तसेच परदेशातील स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवत तिने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. तिच्या या यशामुळे मोटारस्पोर्ट्‌स क्षेत्रात गोव्याचा दबदबा अधोरेखित झाला असून अनेक तरुणींसाठी ती प्रेरणादायी ठरत आहे.

Fastest Lady Driver Ashrafi Gaikwad Goa
Women's Day 2025: गोव्याच्या स्वातंत्र्यासाठी पोर्तुगीजांशी संघर्ष करणारी 'रणरागिणी', सुधाताई जोशी यांची प्रेरणादायी कथा

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त अश्रफी म्हणाली की, समाजाने आखून दिलेल्या चौकटी मोडून स्वतःचा मार्ग निवडणाऱ्या महिलांच्या ताकदीचा सन्मान करण्याची ही योग्य वेळ आहे. व्यावसायिक ऑटोक्रॉस रेसर आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर म्हणून मला जाणवले आहे की धैर्य म्हणजे केवळ ट्रॅकवरील वेग नव्हे, तर स्वतःची जागा, स्वतःचे निर्णय आणि स्वतःचा आवाज ठामपणे मांडण्याची ताकद होय.

Fastest Lady Driver Ashrafi Gaikwad Goa
Womens Day 2026: 'कॅमेऱ्यामागच्या स्त्रिया'! गोमंतकीय चित्रपटसृष्टी आणि वूमन फिल्ममेकर्स; महिला दिन स्पेशल स्टोरी

प्रत्येक महिलेला स्वातंत्र्य मिळायला हवे

प्रत्येक महिलेला आपल्या आवडीच्या क्षेत्रात निर्भयपणे पुढे जाण्याचे स्वातंत्र्य मिळायला हवे. अडथळे मोडा, रूढ कल्पनांना आव्हान द्या आणि आपण किती पुढे जाऊ शकतो हे इतरांना ठरवू देऊ नका. महिला नेतृत्व स्वीकारतात, नवे मार्ग निर्माण करतात आणि मर्यादा नव्याने ठरवतात तेव्हा समाज खऱ्या अर्थाने पुढे जातो, असेही अश्रफीने सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com