Ferdino Rebello: 'सर्व कॅसिनो मांडवी नदीतून बाहेर काढा'! फर्दिन रिबेलो कलम ‘१७ अ’, कॅसिनोविरोधात दाखल कऱणार याचिका

Goa casino section 17a case: नव्‍या कॅसिनो जहाजासह कलम १७ (अ) विरोधात उच्च न्‍यायालयात याचिका दाखल करण्‍यात येणार असल्‍याची माहिती माजी न्‍यायमूर्ती फर्दिन रिबेलो यांनी दिली.
Ferdino Rebello
Ferdino RebelloDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: मांडवी नदीत येऊ घातलेल्‍या नव्‍या कॅसिनो जहाजासह नगरनियोजन कायद्याच्‍या कलम १७ (अ) विरोधात उच्च न्‍यायालयात याचिका दाखल करण्‍यात येणार असल्‍याची माहिती ‘इनफ इज इनफ’ संघटनेचे प्रमुख तथा माजी न्‍यायमूर्ती फर्दिन रिबेलो यांनी दिली.

दोनापावला येथे शनिवारी घेतलेल्‍या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मांडवी नदीत सध्‍या अस्‍तित्त्‍वात असलेले सर्वच कॅसिनो नदीतून बाहेर काढा, ही आमची मूळ मागणी कायम असून, ती तशीच राहील.

Ferdino Rebello
Ferdino Rebello: ‘इनफ इज इनफ'! न्यायमूर्ती रिबेलोंमुळे सामान्य माणसातही ताकद तयार होत चालल्याचे प्रतीत व्हायला लागले आहे..

परंतु, मांडवीत सरकार आणू पाहत असलेल्‍या नव्‍या कॅसिनो जहाजाविरोधात तसेच टीसीपीच्‍या ३९ ‘अ’प्रमाणेच जमीन रुपांतरणासाठी महत्त्‍वाचे असलेल्‍या कलम १७ ‘अ’ विरोधातही उच्च न्‍यायालयात लवकरच संघटनेतर्फे याचिका दाखल करण्‍यात येणार असल्‍याचे रिबेलो म्‍हणाले.

Ferdino Rebello
Ferdino Rebello: ‘गोव्याच्या प्रजेचा आवाज’ कडाडला! न्‍या. रिबेलो यांच्‍या हाकेला उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद; सभेत केल्या 3 मागण्या Watch Video

मुख्‍यमंत्रीच निर्णय घेतील : दामू

दामू नाईक यांनी शनिवारी घेतलेल्‍या पत्रकार परिषदेत फर्दिन रिबेलो यांच्‍या मागण्‍यांबाबत प्रदेश भाजपची भूमिका नेमकी काय आहे? असा प्रश्‍‍न पत्रकारांनी केलेला होता. त्‍यावर रिबेलो यांनी केलेल्‍या मागण्‍यांचा विचार करून मुख्‍यमंत्री योग्‍य तो निर्णय घेतील, असे नाईक यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com