VIDEO: गोव्यात 'बिबट्या'ची दहशत वाढली! घोडेमोडणी आटोपून येणाऱ्या स्कुटरला रात्री दिली धडक; बहीणभाऊ जखमी

Goa Karapur Leopard Accident: धावत्या स्कूटरवर अचानक एका बिबट्याने केलेल्या हल्ल्यात बहीणभाऊ जखमी झाली. मात्र सुदैवाने दोघेही मोठ्या संकटातून सुरक्षित बचावली.
Karapur Leopard Accident | Goa Leopard Accident
Karapur Leopard Accident | Goa Leopard AccidentDainik Gomantak
Published on
Updated on

डिचोली: धावत्या स्कूटरवर अचानक एका बिबट्याने केलेल्या हल्ल्यात बहीणभाऊ जखमी झाली. मात्र सुदैवाने दोघेही मोठ्या संकटातून सुरक्षित बचावली. ही घटना काल (शुक्रवारी) रात्री डिचोली-साखळी या मुख्य रस्त्यावरील विजयनगर-कारापूर भागात घडली. ब्रह्मेश हळर्णकर (वय-२४) आणि संतोषी (खुशी) हळर्णकर (वय-२१) अशी जखमी बहीणभावाची नावे आहेत.

बांबोळी येथील गोमेकॉत उपचार केल्यानंतर दोघांनाही प्रतापनगर- हरवळे येथील घरी पाठवण्यात आले असून दोघेही सुखरूप आहेत, अशी माहिती मिळाली आहे. ब्रह्मेश आणि संतोषी ही बहीणभाऊ काल सायंकाळी गावकरवाडा-डिचोली येथील घोडेमोडणीसाठी गेली होती. घोडेमोडणी आटोपून बहीणभाऊ घरी परतत असताना ही घटना घडली.

मुख्य रस्त्यावरील विजयनगर येथील कालव्याजवळील वळणावर पोचताच अचानक उजव्या बाजूने धावत आलेल्या बिबट्याची धडक स्कुटरला बसली. या धडकेबरोबर स्कूटरसह स्कूटरचालक ब्रह्मेश आणि मागे बसलेली त्याची बहीण संतोषी रस्त्यावर पडून जखमी झाली. या घटनेत ब्रह्मेश याच्या कमरेला आणि हाताला तर संतोषी हिच्या डोक्याला आणि हाताला मार बसला.

Karapur Leopard Accident | Goa Leopard Accident
Leopard In Goa: फाशात अडकलेल्या बिबट्याची सुटका; बोंडला वन्यजीव अभयारण्यात रवानगी

या घटनेनंतर या रस्त्यावरून जाणाऱ्या काही प्रवाशांनी दोघाही जखमींना साखळी येथील सरकारी इस्पितळात नेले. त्या ठिकाणी प्राथमिक उपचार केल्यानंतर दोघांनाही पुढील उपचारासाठी बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयात नेण्यात आले. त्याठिकाणी स्कॅनींग करून दोघांनाही घरी पाठवण्यात आले.

Karapur Leopard Accident | Goa Leopard Accident
VIDEO: वस्तीत घुसला बिबट्या, घरांच्या आसपास बिनधास्त वावर; गोवा - चांदोरमधील थरार पहा..

दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून डिचोलीतील काही भागात बिबट्यांची दहशत वाढली आहे. काही महिन्यांपूर्वी मुळगावात बिबट्याच्या हल्ल्यात बँक अधिकारी जखमी झाला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com