Panaji Corporation Election Dainik Gomantak
गोवा

Panaji Election: पणजीवासीय सूज्ञपणा दाखवतील का? सडेतोड नायक Watch Video

Panaji Corporation Election: पणजी महानगरपालिकेतील सत्तेला शह देण्यासाठी स्वतःचे हेवेदावे बाजूला सारून सर्वपक्षीय नेते एकत्र येऊन आव्हान देतात, तेव्हा हे सर्वजण पणजीकरांसाठी एकत्र आले आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: पणजी महानगरपालिकेतील सत्तेला शह देण्यासाठी स्वतःचे हेवेदावे बाजूला सारून सर्वपक्षीय नेते एकत्र येऊन आव्हान देतात, तेव्हा हे सर्वजण पणजीकरांसाठी एकत्र आले आहेत, असे म्हणता येईल. ऐतिहासिक पणजीचा वारसा टिकवण्यासाठी महानगरपालिका निवडणुकीत पणजीतील नागरिक तथा मतदार मतदान करताना सूज्ञपणा दाखवतील का, असा प्रश्न सडेतोड नायक या गोमन्तक टीव्ही वरील चर्चेतून उपस्थित करण्यात आला.

‘सडेतोड नायक’ या चर्चेत संपादक-संचालक राजू नायक यांच्यासह इतर मान्यवर म्हणून संदीप हेबळे, देविदास आमोणकर आणि महेश म्हांबरे यांनी सहभाग घेतला.

या कार्यक्रमातील चर्चेचा सारांश असा : हेबळे म्हणाले, पणजी हे काही सर्वसाधारण शहर नाही, तर ते आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळ असलेले शहर आहे. पर्यटन स्थळ असल्याने हे शहर योग्य आराखड्याचे असायला हवे होते.

यापूर्वी शहर उभारले गेले तेव्हा रस्ते, खुल्या जागा, क्रीडा संकुले, हिरवळ तसेच शेकडो वर्षांपूर्वीची झाडी होती. आल्तिनो भाग विकसित झाला होता. पण ‘स्मार्ट सिटी’च्या नावाखाली १२०० कोटी रुपये खर्च झाले आणि महापौरसुद्धा या कामांवर आपण समाधानी नसल्याचे सांगतात.

मंत्री बाबूश मोन्सेरात यांना पत्रकारांनी विचारल्यानंतर त्यांनी ‘मलाही डोळे आहेत आणि तुम्हालाही डोळे आहेत’ असे सांगितले. त्यावरून तेही समाधानी नाहीत, म्हणजे या कामाची जबाबदारी कोणीच घेत नाही.

म्हांबरे म्हणाले, स्मार्ट सिटी प्रकल्पानंतरही पणजीची अवस्था पाहिली तर मलनिस्सारण व पार्किंगचे प्रश्न तसेच आहेत. मग १२०० कोटी रुपये खर्च करून नेमके काय काम केले, असा प्रश्न उपस्थित होतो. पणजीतील अनेक सरकारी कार्यालये पर्वरी येथे हलवण्यात आली आहेत; मग पणजीत उरले तरी काय, असा प्रश्नही निर्माण होतो.

पणजीत अजूनही काहीच बदल झालेला नाही. वास्तविक दोन्ही पॅनल भाजपचेच आहेत. उत्पल पर्रीकर अजूनही आपण भाजपचेच आहोत असे म्हणतात.

त्यामुळे दोन्ही पॅनल भाजपचेच आहेत, असा टोला सुरुवातीलाच आमोणकर यांनी लगावला. स्मार्ट सिटीवर चर्चा करताना आमोणकर यांनी शहरात शेकडो कोटी रुपये खर्चून कॅमेरे लावले, पण ते नेमके कुठे लावले, असा सवाल केला.

हेबळे म्हणाले, २००२ ते २००७ या कालावधीत पणजीत चांगले प्रकल्प उभारण्यात आले. त्या काळात कुजिरा कॉम्प्लेक्स उभारण्यात आला, उद्याने विकसित झाली. १५ वर्षांपूर्वी कन्व्हेन्शन सेंटर उभारण्याचा निर्णय झाला, पण आजही तो प्रकल्प मार्गी लागलेला नाही.

सध्या डॉन बॉस्को हायस्कूल समोर सरकारी गॅरेज आहे. त्या ठिकाणी मॉल उभारण्याचा सरकारचा प्रस्ताव आहे. तसेच मिरामार येथे सरकारी जागेत पंचतारांकित हॉटेल उभारले जाणार आहे.

खाडीविषयी कोणीच बोलत नाही!

सांतिनेज खाडी विषयी कोणीच काही बोलत नाही. वीस वर्षांपूर्वीचा जाहीरनामा काढला तरी त्यात या खाडीचा विषय आहे. मतांसाठी येणाऱ्या लोकांना हा जाहीरनामा दाखवला पाहिजे. त्यात या खाडीविषयी अनेक आश्वासने देण्यात आली होती. ती पूर्ण झाली आहेत का, हे त्यांना विचारायला हवे. तसेच एका मंत्र्याने ‘कॅसिनो नसतील तर शहरच नष्ट होईल’ असे म्हटले आहे. हे कसे शक्य आहे, असा प्रश्नही हेबळे यांनी उपस्थित केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mhaje Ghar: 'म्हजे घर'बाबतीत नवी अपडेट! सुनावणी 1 एप्रिलपर्यंत लांबणीवर; याचिकाकर्त्याच्या पात्रतेवर सरकारचा आक्षेप

Human Wildlife Conflict Goa: मानव-वन्‍यप्राणी संघर्ष टाळण्‍यासाठी धोरण! कर्नाटक, केरळच्‍या मॉडेलचा अभ्‍यास करणार असल्‍याची माहिती

Savitribai Phule: विरोधाचे उंबरठे ओलांडून नव्या क्रांतीला जन्म देणाऱ्या 'सावित्रीबाई', वाखाणण्याजोगे शैक्षणिक योगदान

Sanju Samson: 'तो' केवळ सामने जिंकत नाही, लाखो तरुणांना स्वप्न पाहण्याची हिंमत देतो; स्वप्न, संघर्ष अन् सातत्याची कथा

VIDEO: बापरे! वीज कार्यालयातील छताचा भाग कोसळला खाली; म्हापशातील घटनेने चिंतेचे वातावरण

SCROLL FOR NEXT