Goa Police: गोव्यातील 25 मोठे गुन्हे क्राईम ब्रांचच्या ताब्यात ! गुंतागुंतीच्या प्रकरणांचा तपास आता वेगाने; पोलीस ठाण्यांतून गुन्हे वर्ग

Venkateshwara Bullion Gold Scam : गेल्या तीन वर्षांत राज्यातील विविध पोलिस ठाण्यांकडून एकूण २५ प्रकरणे पुढील तपासासाठी गुन्हा अन्वेषण विभागाच्या गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आली आहेत.
Goa Police crime branch investigation news
Goa Police crime branch investigation newsDainik Gomntak
Published on
Updated on

पणजी: गेल्या तीन वर्षांत राज्यातील विविध पोलिस ठाण्यांकडून एकूण २५ प्रकरणे पुढील तपासासाठी गुन्हा अन्वेषण विभागाच्या गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आली आहेत. गुंतागुंतीच्या आणि संवेदनशील प्रकरणांच्या तपासासाठी विशेष पथकावर वाढता भर असल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणांपैकी १४ प्रकरणांचा तपास सुरू असून ७ प्रकरणे न्यायालयांत प्रलंबित आहेत. दोन प्रकरणे बंद करण्यात आली आहेत, तर एका प्रकरणातील प्राथमिक गुन्हा नोंद न्यायालयाने रद्द केला आहे.

महत्त्वाच्या प्रकरणांमध्ये सेंट फ्रान्सिस झेवियर संदर्भातील आक्षेपार्ह वक्तव्य प्रकरण, कुडचडे येथील लैंगिक घोटाळा तसेच पर्वरीतील फसवणूक प्रकरणांचा समावेश आहे. सुकूर येथील वेंकटेश्वर बुलियन गोल्ड प्रकरणात ५.७९ कोटींच्या फसवणुकीचा आरोप असून गुंतवणूकदारांना आकर्षक परताव्याचे आमिष दाखवून फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. जुलै २०२३ मधील आणखी एका प्रकरणात गोवा अर्बन सहकारी बँकेचे अधिकारी व मरीना रिसॉर्ट्स प्रायव्हेट लिमिटेडच्या संचालकांवर आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप आहेत.

Goa Police crime branch investigation news
Goa Crime: नराधम कार क्लिनरची 10 वर्षांची सक्तमजुरी कायम! उच्च न्यायालयाचा पीडितेच्या बाजूने मोठा कौल; आरोपीची फेटाळली याचिका

महत्त्वाची प्रकरणे

  • सेंट फ्रान्सिस झेवियर संदर्भातील आक्षेपार्ह वक्तव्य प्रकरण

  • कुडचडे येथील लैंगिक घोटाळा

  • पर्वरीतील दोन फसवणूक प्रकरणे

  • ५.७९ कोटींची सोन्यातील गुंतवणूक फसवणूक

  • गोवा अर्बन बँक–मरीना रिसॉर्ट्स प्रकरण

योजनेत ५.३६ कोटींचा गैरव्यवहार

समग्र शिक्षण अभियानांतर्गत ५.३६ कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराचे प्रकरण गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले असून या प्रकरणात चार जणांना अटक करण्यात आली आहे. दवर्ली येथील वकील जयंत प्रभू मृत्यू प्रकरण तसेच नावेलीतील एडबर्ग परेरा पोलीस कोठडी मारहाण प्रकरणाचाही तपास सुरू आहे. एकूणच, गुंतागुंतीच्या आणि संवेदनशील गुन्ह्यांच्या तपासासाठी गुन्हे शाखेची भूमिका अधिक महत्त्वाची ठरत असल्याचे चित्र समोर आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com