Panaji Traffic Diversion Dainik Gomantak
गोवा

Panaji Traffic Diversion: पणजीत शुक्रवारपासून वाहतुकीत बदल! स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर 'या' रस्त्यांवर वाहनांना 'नो-एंट्री', पाहा पर्यायी मार्ग

Panaji Independence Day Traffic Restrictions: स्वातंत्र्यदिनानिमित्त १५ ऑगस्ट २०२६ रोजी पणजीतील जुन्या सचिवालयासमोर (डी. बी. मार्ग) होणाऱ्या शासकीय सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर गोवा वाहतूक पोलिसांनी विशेष ॲडव्हायझरी जारी केली आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: स्वातंत्र्यदिनानिमित्त १५ ऑगस्ट २०२६ रोजी पणजीतील जुन्या सचिवालयासमोर (डी. बी. मार्ग) होणाऱ्या शासकीय सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर गोवा वाहतूक पोलिसांनी विशेष ॲडव्हायझरी जारी केली आहे.

मंडपाची उभारणी आणि सुरक्षेच्या कारणास्तव शुक्रवार, १४ आणि शनिवार, १५ ऑगस्ट रोजी पणजी शहरातील वाहतुकीत महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. स्वातंत्र्यदिन संचलनासाठी येणाऱ्या नागरिकांच्या वाहनांसाठी आबाद फारिया पुतळा ते कासा इंटरनॅशनल जंक्शनदरम्यानचा एम.जी. रोडचा भाग आरक्षित ठेवण्यात आला आहे.

१४ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजल्यापासून भाऊसाहेब बांदोडकर पुतळा ते आबाद फारिया पुतळ्यापर्यंतचा डाव्या बाजूचा रस्ता मंडप उभारणीसाठी वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. तसेच रात्री ८ वाजल्यापासून १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनाचा कार्यक्रम संपेपर्यंत फेरी धक्का जंक्शन ते बांदोडकर पुतळ्यापर्यंतचा डी.बी. मार्ग दोन्ही बाजूंनी सर्व प्रकारच्या वाहनांसाठी पूर्णपणे बंद राहील.

नव्या पाटो पुलावरून शहरात येणारी वाहने बांदोडकर पुतळ्याजवळ डाव्या बाजूने जुन्या सचिवालयाच्या मागून जोआव कास्त्रो रोड-जुझे फाल्काव रोड येथून वाहतूक सुरळीत सुरू असेल. तसेच फेरी धक्क्यावरून शहराबाहेर जाणाऱ्या वाहनांना पोलिस मुख्यालय-शासकीय मुद्रणालय जंक्शनकडे वळवण्यात येईल. तेथून युको बँक, सरस्वती मंदिर इमारत, चर्च स्क्वेअर मार्गे जुना पाटो पूल/नवीन मळा पुलावरून वाहनांची ये-जा सुरू राहील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Diwali Bonus for Central Govt Employees: केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीची मोठी भेट! मोदी सरकारकडून बोनस जाहीर; खात्यात येणार 'इतके' पैसे

Crime News: आधी प्रेमसंबंध, नंतर हत्येचा कट! पत्नीने पतीच्या मदतीने प्रियकराचा गळा आवळला; मृतदेह गोणीत भरून कालव्यात फेकला

Triple Talaq Case: लग्नानंतर 21 वर्षे संसार, 3 मुलं आणि आता...! बायकोला ट्रिपल तलाक देणाऱ्या नवऱ्याला कोर्टाचा दणका; सुनावली 'इतक्या' वर्षांची शिक्षा अन् दंड

VIDEO: 'सर्वात मोठे ओठ' बनवण्याचा अट्टहास! डॉक्टरांनी नकार दिल्यावर महिलेने घरीच घेतलं इंजेक्शन; पुढे नको तेच झालं, पाहा व्हिडिओ

Bulbul Film Festival: बुलबुल बालचित्रपट महोत्सवाची सांगता; 'द ग्रेट ग्रॅंड सुपर हिरो'चे प्रदर्शन, सर्वोत्तम चित्रपटाची घोषणा

SCROLL FOR NEXT