FC Goa vs FC Arkadag: एफसी गोवाची झुंजीनंतर हार, एफसी अर्कादाग संघाचा 3-0 दणदणीत विजय

AFC Champions League 2: पराभवामुळे भारतीय सुपर कप विजेत्या एफसी गोवा संघाला आता एएफसी चॅलेंज लीगमध्ये खेळावे लागेल. गटसाखळीतील ही स्पर्धा १७ ऑक्टोबरपासून खेळली जाईल.
AFC Champions League 2
FC Goa vs FC ArkadagDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: मुख्य प्रशिक्षकापासून खेळाडूंपर्यंत नव्या स्वरुपात खेळणाऱ्या एफसी गोवाने पूर्वार्धात झुंज दिली, पण एएफसी चँपियन्स लीग २ फुटबॉल स्पर्धेच्या प्ले-ऑफ लढतीत ते उत्तरार्धात हार टाळू शकले नाहीत. तुर्कमेनिस्तानच्या बलाढ्य एफसी अर्कादाग संघाने ३-० असा विजय मिळवून स्पर्धेच्या मुख्य गटसाखळी स्पर्धेसाठी पात्रता मिळविली.

पराभवामुळे भारतीय सुपर कप विजेत्या एफसी गोवा संघाला आता एएफसी चॅलेंज लीगमध्ये खेळावे लागेल. गटसाखळीतील ही स्पर्धा १७ ऑक्टोबरपासून खेळली जाईल.

सामना बुधवारी रात्री तुर्कमेनिस्तानमधील अर्कादाग येथे झाला. कर्णधार संदेश झिंगन व उदांता सिंग यांचा अपवाद वगळता गौरमांगी सिंग यांच्या मार्गदर्शनाखालील एफसी गोवा संघातील बाकी सारे खेळाडू नवोदित होते. परदेशी खेळाडूंत आलेक्स व्हायेहो, ख्रिस्तियन इसाबेल (चिकी), फ्रान्चू, आलेक्स सालाया यांनी एफसी गोवातर्फे पदार्पण केले. गोलरक्षणाची जबाबदारी युवा बॉब जॅकसन राज याने सांभाळली.

AFC Champions League 2
Goa vs Oman T20: गोव्याकडून ओमानला विजयाची 'भेट'; मोहित रेडकर, दीपराज गावकरचा बोथट मारा; क्षेत्ररक्षणही गचाळ

पूर्वार्धात तुर्कमेनिस्तानमधील राष्ट्रीय विजेत्या अर्कादाग संघाला एफसी गोवाने गोलशून्य बरोबरीत रोखले होते. तुर्कमेनिस्तानमध्ये झालेल्या या सामन्याचे थेट प्रक्षेपण नसल्यामुळे एफसी गोवाच्या चाहत्यांचा मात्र हिरमोड झाला. प्रक्षेपण न करण्याचा निर्णय एफसी अर्कादाग संघाने घेतला होता.

AFC Champions League 2
Bison In Goa: नार्वेत गव्यांचा धुमाकूळ! भाजी पिकाची नासधूस, बंदोबस्‍ताची मागणी; ऐन पिकाच्या हंगामात शेतकऱ्यांना आर्थिक फटका

अर्कादाग संघाच्या विजयात बदली खेळाडू मेयलिस दिनियेव याने ६१व्या, रहमान मायरातबेर्डीयेव याने ६५व्या, तर अर्झुवगुली सापारगुलयेव याने ७५व्या मिनिटास प्रत्येकी एक गोल केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com