casino panaji Dainik Gomantak
गोवा

Panaji: चारवेळा ओके म्हणाला, पाचव्यांदा नाही मिळाला रिस्पॉन्स; कॅसिनो स्वच्छ करण्यासाठी पाण्यात उतरलेल्या डायव्हरचा मृत्यू

Panaji Casino: क्लेरन्स डिझोझा सर्व आवश्यक खबदारी घेऊन जहाज स्वच्छ करण्यासाठी पाण्यात उतरले होते.

Pramod Yadav

पणजी: कॅसिनो जहाज स्वच्छ करण्यासाठी पाण्यात उतरलेल्या व्यावसायिक डायव्हरचा मृत्यू झाला आहे. गोमेकॉत दाखल करण्यात आल्यानंतर डॉक्टरांनी डायव्हरला मृत घोषित केले. क्लेरन्स डिसोझा (४२, रा. हळदोणा) असे मृत डायव्हरचे नाव आहे. मंगळवारी (०२ सप्टेंबर) मांडवीतील एका कॅसिनोत ही घटना घडली.

क्लेरन्स डिसोझा हे व्यावसायिक डायव्हर आहेत. जहाज स्वच्छ करण्याच्या खासगी कामातून ते उदरनिर्वाह करत होते. मंगळवारी त्यांना पणजीतील एका कॅसिनोचे जहाज स्वच्छ करण्याचे काम मिळाले होते. डिझोझा सर्व आवश्यक खबदारी घेऊन जहाज स्वच्छ करण्यासाठी पाण्यात उतरले होते. पाण्यात उतरण्यापूर्वी त्यांनी त्यांनी कंनीच्या चेकलिस्टवर सही केली होती.

क्लेरन्स यांचा सहकारी देखील त्यांच्यासोबत होता. सर्व आवश्यक खबरदारी घेऊन ते पाण्यात उतरले. दोघेही एकमेकांच्या संपर्कात होते. प्रत्येक १५ मिनिटांनी सहकारी डायव्हर क्लेरन्स यांनी दोरीने बाहेर ओढून ते व्यवस्थित आहेत का? याची चौकशी करत होते. चारवेळा त्यांना बाहेर काढून चौकशी करण्यात आली पण पाचव्या वेळी त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

यानंतर तत्काळ त्यांना बाहेर काढून सीपीआर देऊन कांपाल येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, यावेळी येथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. यानंतर त्यांना बांबोळी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पोलिस उपनिरीक्षक शाहीन शेट्ये याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Canada Technology Deal: भारत-कॅनडा टेक डील! विद्यार्थ्यांना मिळणार एआय आणि डेटा सायन्सचे धडे, बंगळुरुमध्ये दीपस्पेशियलचे दोन मोठे करार

Goa Regional Development: गोव्याचे भौतिकशास्त्र आणि राज्यशास्त्र! कॅसिनो, खाणउद्योग अन् विकासाच्या राजकारणाचा वेध

प्रयत्ने साखरेचे कण वेचिता... तक्रारी सोडा, आनंदाचे क्षण निवडा; सुखी आयुष्याचा सुंदर मंत्र!

Egypt Tourism: इजिप्तचा गूढ वारसा! पिरॅमिड्सपासून नाईल नदीपर्यंत; इतिहास, संस्कृती अन् आधुनिकतेचा अद्भुत संगम

JNU Global Reputation: जेएनयूच्या पाण्यात काय आहे?

SCROLL FOR NEXT