Panaji Dainik Gomantak
गोवा

Panaji News : शैक्षणिक साहित्यालाही महागाईची झळ; १५ टक्क्यांपर्यंत दरवाढीने पालकांचे बजेट कोलमडले

गोमन्तक डिजिटल टीम

Panaji News :

पणजी, राज्यात ४ जून पासून नव्या शैक्षणिक वर्षाला सुरूवात होत असल्याने पाल्यांसाठी लागणारे दप्तर, वह्या, पेन, पेन्सिल खरेदीसाठी बाजारात पालक, विद्यार्थी मोठ्या प्रमाणात येत आहेत.

शैक्षणिक साहित्याच्या दरात दिवसेंदिवस वाढ होत आहे मागील वर्षाच्या तुलनेत सर्वच शैक्षणिक साहित्यात ५ ते १५ टक्क्यांंनी वाढ झाल्याने अतिरिक्त भार पालकांवर येत असल्याने बहुतांश पालकांचे बजेट कोलमडले आहे.

यंदा मागील वर्षीच्या तुलनेत जर सर्वाधिक शैक्षणिक पुस्तकाची दरवाढ झाली असेल तर ती जरनलची झाली आहे. विद्यार्थ्यांना भूगोल आणि विज्ञान विषयासाठी लागणाऱ्या जर्नलच्या किंमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. भूगोल जर्नलचा दर गतवर्षी २५ रूपये होता तो यंदा ७५ रूपयांना मिळत आहे. विज्ञान विषयाचा ३५ रूपयांना मिळणारा जरनल आता १२० रूपये झाला आहे त्यामुळे अनेक विद्यार्थी, तसेच पालक विक्रेत्यांना जुने जर्नल असल्यास द्यावेत अशी विचारणा करत असल्याचे विक्रेते सांगतात.

शैक्षणिक साहित्यात दरवर्षी ५ ते १० टक्क्यांनी वाढ होत असते. परंतु यंदा जरनलच्या किंमतीत अकस्मात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. ४ जूनपासून शाळा सुरू होत असल्याने अनेक पालक आपल्या मुलांसोबत शैक्षणिक साहित्य खरेदी करण्यासाठी येत आहेत. ४ जूननंतर मोठ्या प्रमाणात खरेदीला गर्दी होईल, असे वाटते.

-चंद्रकांत परब, शैक्षणिक साहित्य विक्रेते.

वह्या महागल्या

मागील वर्षाच्या तुलनेत यंदा शंभर पानी, दोनशे पानी वह्यांच्या दरात वाढ झाली आहे. १०० पानी मोठी वही जाड पुठ्याची गेल्यावर्षी १४० रूपयांना ४ नग विकले जायचे त्यांची किंमत १८५ झाली आहे. २०० पानी मोठी जाड पुठ्याची वही २२५ रूपयांना ४ नग विकले जायचे ते आता २५० रूपयांना विकले जात आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

St. Francis Xavier DNA चाचणी मागणीने गोव्यात धार्मिक तेढ; हिंदुवादी संघटना, ख्रिस्ती समाजाचे राज्यभर मोर्चे, वातावरण तंग

Saint Estevam Accident: बाशुदेव भंडारी बेपत्ता प्रकरणी मित्र कल्पराज आणि प्रेयसीची दोन तास चौकशी; पोलिसांकडून प्रश्नांची सरबत्ती!

Goa Today's News Live: हिंदुत्ववादी संघटनांचे वेलिंगकरांना समर्थन, ख्रिस्ती समाजाकडून अटकेची मागणी; राज्यभरात मोर्चे

Sunburn Festival 2024: सनबर्नविरोधात कामुर्लीत स्थानिकांचा कडक विरोध; उद्याची बैठक ठरणार निर्णायक!

Mhadei Water Dispute: ...कर्नाटकाविरोधात लढण्यास सावंत सरकार ठरले कुचकामी; आलेमाव यांचा घणाघात

SCROLL FOR NEXT