Goa Drowning Case: राजबाग येथे संगीतकार तर वास्कोत दीड वर्षीय चिमुकलीचा समुद्रात बुडून मृत्यू

Goa Drowning Case: लहान मुलीचे कुटुंब वास्को - खारीवाडा समुद्र किनाऱ्यावरच राहयला आहे.
Goa Drowning Case
Goa Drowning CaseDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Drowning Case

गोव्यात समुद्रात बुडून मृत्यू झाल्याच्या दोन घटना गुरुवारी (दि.30) समोर आल्या आहेत. एक राजबाग येथे तर वास्को - खारीवाडा येथे दुसरी घटना घडली आहे. राजबाग समुद्रात बंगळुरुच्या संगीतकाराचा आणि वास्को-खारीवाडा येथे दीड वर्षीय चिमुकलीचा बुडून मृत्यू झाला.

राजबाग येथे संगीतकाराचा मृत्यू

राजबाग येथे समुद्रात पोहण्यासाठी गेलेल्या क्लिमेंत स्टेनली (२९) याचा बुडून मृत्यू झाला. क्लिमेंत तीन दिवसांपूर्वी कुटुंबियांसोबत पाळोळे येथे आले होते.

राजबाग येथील समुद्रकिनाऱ्यावर पोहण्यासाठी गेले असता क्लिमेंत यांचा बु़डून मृत्यू झाला. काणकोण पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीनंतर नातेवाईकांकडे सुपूर्द केला. क्लिमेंत प्रसिद्ध संगीतकार असल्याची माहिती समोर आली असून, त्यांचे नातेवाईक देखील मोठ्या पदावरील अधिकारी असल्याचे सांगितले जाते.

Goa Drowning Case
Goa Politics: सभापती तवडकर म्हणतात... 'मुंगी चावली तर प्रसंगी तिला चिरडावी लागतेच'

वास्को - खारीवाडा येथे दीड वर्षीय चिमुकलीचा बुडून मृत्यू

वास्को - खारीवाडा येथे दीड वर्षीय चिमुकलीचा समुद्रात बुडून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (दि.30) सायंकाळी उघडकीस आली. लहान मुलगी खेळत खेळत समुद्राच्या दिशेने गेली आणि पाण्यात पडली. स्थानिकांनी तिला बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले पण, तिला मृत घोषित करण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, लहान मुलीचे कुटुंब वास्को - खारीवाडा समुद्र किनाऱ्यावरच राहयला आहे. पोलिसांनी पंचनामा करुन मृतदेह मडगाव जिल्हा रुग्णालयाच्या शवगृहात पाठविण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

America Double Murder Case
Nerul fisherman death
Nepalese Man Acquitted In POCSO Case
Sexual Assault Case Khorlim Mapusa
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com