सार्वजनिक बांधकाम विभागाने दिलेल्या माहितीनुसार 'स्मार्ट सीटी' अंतर्गत काकुलो मॉल ते हाजी अली मार्ग दुरुस्तीचे काम सुरु केले आहे. आज मुख्य मार्ग मध्येच उखडला गेल्याने दोन्ही बाजुंनी ये-जा प्रवास करणाऱ्या वाहनांना ऐनवेळी आपले मार्ग बदलावे लागत होते. यामुळे लगतच्या रस्त्यांवर वाहनांची वर्दळ वाढल्याचे चित्र सकाळी पहायला मिळत होते.
(Panaji caculo mall to haji ali stinez road will close for upcoming 2 months)
सार्वजनिक बांधकाम विभागाने दिलेल्या माहितीनुसार 'स्मार्ट सीटी' अंतर्गत काकुलो मॉल, सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालय ते हाजी अलीपर्यंतच्या मार्गावर जलवाहिनी, सांडपाणी व्यवस्थापन यांच्या दुरुस्तीचे काम करण्यात आले आहे. त्यामुळे पुढील दोन महिने हा मार्ग वाहतूकीसाठी बंद असणार आहे. या कामाचा वेग वाढण्यासाठी प्रशासनाने हा मार्ग बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. गोवा प्रशासन विभागाने याबाबत दहा दिवसांपुर्वीच नोटीस जारी केली आहे.
नोटीसनूसार पुढील 60 दिवस काकुलो मॉल, ( सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालय, पणजी ) ते हाजी अलीपर्यंतचा मार्ग जलवाहिनी, सांडपाणी व्यवस्थापन दुरुस्ती तसेच रस्ता दुरुस्तीसाठी बंद ठेवला जाणार आहे. या बंद असणाऱ्या मार्गामुळे आता शंकरवाडीकडून येणाऱ्या वाहनांना काकुलो मॉलकडे न वळता थेट पुढे जावे लागणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.