Panaji Ashtmi Feri News Dainik Gomantak
गोवा

Panaji Ashtami Ferry: अष्टमीच्या फेरी अर्जातून महापालिकेला 20 लाखांचा महसूल

पुरेशी रक्कम नसल्याने व्यावसायिकांनी नेले अर्ज; आज करणार सादर

दैनिक गोमन्तक

Panaji Ashtami Ferry: राजधानीतील अष्टमीच्या फेरीसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होती. यावर्षी भाडेवाड केल्याने व एकरकमी सर्व पैसे भरावयाचे असल्याने काहीच व्यावसायिकांनी मंगळवारी अर्ज सादर केले. त्यातून महानगरपालिकेला सुमारे 20 लाखांच्यावर महसूल प्राप्त झाला असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

अष्टमीच्या फेरीसाठी मंगळवारी सकाळी साडेदहानंतर अर्ज स्वीकारण्याच्या कामास महानगरपालिकेचे आयुक्त ग्लेन मेदेरा यांच्या मार्गदर्शनाखाली करअधिकारी सिद्धेश नाईक व इतर कर्मचाऱ्यांनी सुरवात केली.

तत्पूर्वी रांगा लावून गर्दी केलेल्या परप्रांतीय व्यावसायिकांना ज्यांची एकरकमी रक्कम भरण्याची तयारी आहे, त्यांना क्रमांकाचे कुपन देण्यात आले होते. त्या कुपननुसार अर्ज स्वीकारण्याचे काम सायंकाळपर्यंत सुरू ठेवले होते.

कुपन घेतले तरी अनेकांकडे पुरेशी रक्कम नव्हती. त्यामुळे अनेक व्यावसायिकांनी ५०० रुपये भरून अर्ज नेले असून, उद्या बुधवारी ते सादर करू असे सांगितले आहे. महानगरपालिकेने या व्यावसायिकांना सवलत दिली आहे.

व्यावसायिकांकडून २ बाय ४ आकाराच्या दुकानासाठी १२ दिवसांचे एकरकमी २६ हजार ४०० आणि अर्जाचे ५०० रुपये असा दर निश्‍चित करण्यात आला आहे. एवढी मोठी रक्कम एकदम भरायची असल्याने ज्या व्यवसायिकांनी रांग लावली होती, त्यातील अनेकांनी रकमेचा आकडा पाहून तेथून काढता पाय घेतला.

परंतु काहींनी कुपन घेऊन ठेवल्याने त्यांना उद्या रक्कम भरता येणार आहे. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पणजी शहर पोलिस स्थानकाचे पोलिस सकाळपासून तैनात होते.

दुकानासाठी 26,400 रु. भाडे

अष्टमीच्या फेरीमध्ये ४०० दुकानांचे नियोजन करण्यात आले आहे. त्यातील काही दुकानांचा आकार २ बाय ४, ४ बाय ४ आणि त्यापुढे मोठ्या आकाराची शंभर दुकाने फर्निचरवाल्यांसाठी असणार आहेत.

बारा दिवस ही फेरी राहणार असल्याने महानगरपालिकेने यंदा एकरकमी सर्व पैसे जमा करून घेण्याचे ठरविले आहे. त्यानुसार २ बाय ४ आकाराच्या दुकानासाठी व्यावसायिकाला २६ हजार ४०० आणि अर्जाचे ५०० रुपये भरून घेतले जात होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi: ..जातां पंढरीसी सुख वाटे जीवा। गोव्यातील लाखो वारकऱ्यांनी गाठले पंढरपूर

Sanguem Rathotsav: विठ्ठल, विठ्ठल! सांगेत भाविकांचा पूर, रथोत्सवानिमित्त होणार विठूनामाचा गजर

Goa Live News Updates: ऑनलाईन फ्रॉडमधून ३ लाख ३५ हजार रुपयांचा गंडा

Goa Crime: अनैतिक संबंधातून पतीचा खुन! संशयितेला व्‍हिडिओ कॉन्‍फरन्‍सिंगमध्‍ये आणण्यात अपयश; कोलवाळ तुरुंग अधीक्षकाला नोटीस

Criminals In Goa: पोलिसांवर हल्ला, अनेकदा फरार! दिल्लीतील ‘गोगी टोळी’च्या गुंडास गोव्यात अटक; गुन्हेगारांसाठी बनतेय ‘आश्रयस्थान’?

SCROLL FOR NEXT