Manoj Parab
Manoj ParabDainik Gomantak

Manoj Parab: म्हापसा ‘टीसीपी’वर नेणार मोर्चा

रिव्होल्युशनरी गोवन्स पक्ष शुक्रवारी म्हापशाच्या नगर नियोजन कार्यालयावर मोर्चा नेणार आहे.
Published on

Manoj Parab: रिव्होल्युशनरी गोवन्स  पक्ष शुक्रवारी (ता.८) म्हापशाच्या नगर नियोजन कार्यालयावर मोर्चा नेणार आहे. नगर नियोजन विभागातील वरिष्ठ अधिकारी गब्बर बनले असून बेकायदा मेगा प्रकल्पांना परवानगी देत असल्याचे आरोप रिव्होल्युशनरी गोवन्स  पक्षाचे अध्यक्ष मनोज परब यांनी केले.

Manoj Parab
Goa Politician Scandal: मंत्र्याची बदनामी; 10 दिवसांनंतरही तपास शून्य

पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत मनोज परब म्हणाले की, गोव्यात मोठ्या प्रमाणावर पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. डोंगर कापणे, जमीन भरणे, मोठ्या गृहनिर्माण प्रकल्पांची सर्रास बांधकामे विनापरवाना होत आहेत.

विधानसभेच्या अधिवेशनात सांतआंद्रेचे आमदार वीरेश बोरकर यांनी राज्यात येणाऱ्या मेगा प्रकल्पांचा मुद्दा उपस्थित केला होता. कामुर्ली गावात येऊ घातलेल्या मेगा प्रकल्पाबाबत आम्ही नगरनियोजन मंत्री विश्वजीत राणे यांची भेट घेतली.

Manoj Parab
Goa Tourism Department: शॅक दुसऱ्याला दिल्यास खबरदार!

या मेगा प्रकल्पाबाबत आम्ही मे महिन्यात तक्रारीही केल्या होत्या. मात्र, अद्यापही या विभागाकडून कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही.

टीसीपी खात्याच्या प्रमुख अधिकाऱ्यांना याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली होती; परंतु आजपर्यंत त्या अधिकाऱ्याने कोणतीच कार्यवाही केलेली नसून, स्वतः टीसीपी मंत्र्यांनी कार्यवाही करण्याचा दिलेला आदेशही हा अधिकारी जुमानत नसल्याचे दिसून येत आहे.

- मनोज परब, अध्यक्ष, ‘आरजी’

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com