Mango Farming Goa Dainik Gomantak
गोवा

Mango Farming: एकाच बागेत घेतात 26 जातींच्या आंब्यांचे उत्पादन, पाली-सत्तरीतील आंब्यांना राज्याबाहेरही मागणी; बाग पाहण्यासाठी होतेय गर्दी

Pali Sattari 26 Mango Varieties: सत्तरी तालुका हा पारंपरिकरीत्या कृषिप्रधान म्हणून ओळखला जातो. मात्र, गेल्या काही वर्षांत येथे आंबा उत्पादनाने विशेष वेग घेतला आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

वाळपई: सत्तरी तालुका हा पारंपरिकरीत्या कृषिप्रधान म्हणून ओळखला जातो. मात्र, गेल्या काही वर्षांत येथे आंबा उत्पादनाने विशेष वेग घेतला आहे. महाराष्ट्र आंब्यांसाठी प्रसिद्ध असला तरी आता गोव्यातील सत्तरी तालुकाही या स्पर्धेत उतरला असून येथील आंब्यांना राज्याबरोबरच बाहेरील बाजारपेठांमध्ये मोठी मागणी निर्माण होत आहे.

पाली-सत्तरी येथील प्रगतिशील शेतकरी राकेश सिंग यांनी आपल्या १० एकर शेतीत सुमारे १५०० आंब्याची झाडे लावून एक आदर्श उभा केला आहे. त्यांच्या बागेत तब्बल २६ विविध जातींच्या आंब्यांचे उत्पादन घेतले जाते.

गोव्याचा ‘राजा’ म्हणून ओळखला जाणारा मानकुराद आणि केशर या जातींची त्यांनी मोठ्या प्रमाणात लागवड केली आहे. या दोन प्रमुख जातींपासून सुमारे १५ क्विंटल उत्पादन मिळते, तर सिंधू, आम्रपाली, हापूस, लड्डू, तोतापुरी आणि निलम या इतर जातींपासून प्रत्येकी २ ते ३ क्विंटल आंबे मिळतात.

यंदा झाडांना चांगली फुलधारणा आणि फळधारणा झाल्यामुळे उत्पादनात वाढ झाली आहे. एप्रिलच्या सुरवातीलाच आंब्यांची काढणी सुरू झाली असून सध्या बाजारात चांगला दर मिळत आहे.

राकेश सिंग यांच्या बागेतील आंबे गोव्यासह महाराष्ट्र, मुंबई, गुजरात आणि इतर राज्यांत पाठवले जात आहेत. विशेष म्हणजे, दोन वर्षांपूर्वी त्यांच्या आंब्यांनी थेट अमेरिकेपर्यंत मजल मारली होती, ही त्यांच्या यशाची मोठी पावती मानली जाते.

दरम्यान, निसर्गरम्य आणि शांत परिसरात वसलेली ही बाग पाहण्यासाठी अनेकजण भेट देत आहेत. सत्तरीतील आंबा उत्पादनाचा हा वाढता प्रवास भविष्यात अधिक बळकट होईल, अशी आशा व्यक्त होत आहे.

रोजगारनिर्मितीवरही लक्ष

राकेश सिंग यांनी उत्पादनाबरोबरच रोजगारनिर्मितीवरही लक्ष केंद्रित केले आहे. बागेतील विविध कामांसाठी स्थानिक तसेच गरजेनुसार इतर कामगारांना रोजगार मिळत आहे. झाडांची निगा राखणे, औषध फवारणी, काढणी अशा कामांमुळे अनेक कुटुंबांना उत्पन्नाचे साधन उपलब्ध झाले आहे. तसेच, उरलेल्या आंब्यांवर प्रक्रिया करून त्यांचा योग्य उपयोग केला जात असल्याने फळांची नासाडीही टाळली जाते.

नैसर्गिक पद्धतीने पिकवतात आंबे

या बागेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे येथे आंबे पूर्णपणे नैसर्गिक पद्धतीने पिकवले जातात. गवतामध्ये पिकवलेले आंबे अधिक चवदार, सुगंधी आणि टिकाऊ असतात. कोणत्याही प्रकारचे रासायनिक पदार्थ न वापरल्यामुळे ग्राहकांचा विश्वास जिंकण्यात सिंग यांना यश आले आहे. गेल्या वर्षी त्यांनी आणखी १२०० नवीन झाडांची लागवड केली असून पुढील वर्षांपासून त्याचे उत्पादन मिळण्यास सुरवात होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

राजकारणात खळबळ! पक्षाच्या कार्यालयात लटकलेल्या अवस्थेत आढळला नेत्याचा मृतदेह; सुसाइड नोटमध्ये लिहिलं, 'राजकारणात आलो, हीच मोठी चूक'

ICC ODI World Cup 2027: अखेर ठरलं! वनडे वर्ल्ड कपचा थरार 'या' तारखेपासून रंगणार; अंतिम सामन्याचीही तारीख निश्चित

Horoscope: रविवार ठरणार खास! वृषभ-कर्कसह 'या' राशींवर लक्ष्मीची कृपा, घरात सुख-समृद्धी अन् नोकरीत प्रमोशनचे संकेत

Government Jobs: कर्मचारी भरती आयोगाकडून 3 हजार नोकऱ्या; आता आणखी 2 हजार पदांसाठी सरकार सज्ज, CM प्रमोद सावंतांची मोठी घोषणा

Bori Road Safety Issue: बोरीतील धोकादायक साकवाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष? कठडा तुटल्याने वाहनचालकांच्या जीवाला धोका, तातडीने दुरुस्तीची गरज

SCROLL FOR NEXT