Bank Employees Strike: शनिवारच्या सुट्टीसाठी बँक कर्मचाऱ्यांची आरपारची भूमिका; 40 मिनिटे अतिरिक्त कामाची तयारी, मात्र मागणी मान्य होईपर्यंत संप कायम

Goa Bank Employees: सरकारने बॅंक कर्मचाऱ्यांना शनिवारी सुट्टी देण्याचे मान्य करून देखील त्याची अंमलबजावणी केलेली नाही.
Bank Employees Strike
Bank Employees StrikeDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पणजी: सरकारने बॅंक कर्मचाऱ्यांना शनिवारी सुट्टी देण्याचे मान्य करून देखील त्याची अंमलबजावणी केलेली नाही. देशातील सर्व आर्थिक संस्था सोमवार ते शुक्रवारपर्यंत काम करतात. मग बॅंकांनाच दोन शनिवार अधिक कामकाज का? शनिवारच्या सुट्टीसाठी दरदिवशी ४० मिनिटे अतिरिक्त काम करायला देखील आम्ही तयार आहोत. जोपर्यंत सरकार मागणी मान्य करत नाही, तोपर्यंत टप्प्याटप्याने संप कायम राहील, असे गोवा युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सचे गोवा विभाग समन्वयक संतोष हळदणकर यांनी सांगितले.

‘पीएलआय’मधील भेदभाव दूर करा

पीएलआय योजनेअंतर्गत बँकेचा लाभांश सर्व कर्मचाऱ्यांमध्ये विभागला जात होता. मात्र, आता स्केल ४ ते ७ मधील अधिकाऱ्यांना मोठ्या प्रमाणात रक्कम दिली जाते, तर इतर कर्मचाऱ्यांना तुटपुंजी रक्कम मिळते. हा भेदभाव दूर करून सर्व कर्मचाऱ्यांना समान लाभांश देण्यात यावा, अशी मागणी हळदणकर यांनी केली.

Bank Employees Strike
Goa Politics: फक्त निवडणुका आल्यावर यात्रा काढून उपयोग नाही! 'भाजप जनतेसोबत' म्हणत दामू नाईकांचा काँग्रेसला सणसणीत टोला

बँक कर्मचाऱ्यांविषयी नकारात्मकता : बॅंक कर्मचारी संपावर जाणार आहेत. त्यामुळे रविवारी बॅंका सुरू ठेवणार असल्याचे सांगत सरकारने नागरिक आणि ग्राहकांमध्ये बॅंक कर्मचाऱ्यांच्या विरोधात नकारात्मकता पसरविण्याचा प्रयत्न केला आहे. रविवारी बॅंका सुरू ठेवल्यास कर्मचाऱ्यांचे वेतन द्यावे लागणार नाही का? अहंकार दुखावला असल्यानेच सरकार अशाप्रकारे वागत आहे, असे मॅक्सी परेरा म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com