Paira Bicholim Mining Dainik Gomantak
गोवा

Paira Bicholim: '..तोपर्यंत माघार घेणार नाही'! पैरावासीयांचे आंदोलन सुरूच; ‘साळगावकर’ खाणीवरील कामकाज पूर्णपणे ठप्प

Paira Bicholim Mining Dispute: प्रलंबित मागण्या पुढे करून पैरावासीयांनी सुरू केलेल्या आंदोलनामुळे सलग दुसऱ्या दिवशीही ‘साळगावकर’ खनिज खाणीवरील कामकाज पूर्णपणे ठप्प झाले.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Mining Controversy : प्रलंबित मागण्या पुढे करून पैरावासीयांनी सुरू केलेल्या आंदोलनामुळे सलग दुसऱ्या दिवशीही ‘साळगावकर’ खनिज खाणीवरील कामकाज पूर्णपणे ठप्प झाले. दुसऱ्या बाजुने आंदोलन मोडून काढण्यासाठी खाण कंपनीच्या व्यवस्थापनाकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत.

आंदोलनकर्त्या पैरावासीयांबरोबर बैठक घेण्याची तयारीही कंपनी व्यवस्थापनाने ठेवली आहे. तसा प्रस्तावही कंपनीने आंदोलनकर्त्यांसमोर ठेवला आहे. मात्र, आमच्या मागण्या मान्य होत असेल, तरच आम्ही बैठकीत सहभागी होऊ.

असा पवित्रा आंदोलनकर्त्यांनी घेतला आहे. आमच्या मागण्या मान्य होईपर्यंत आम्ही माघार घेणार नाही. असा निर्धारही त्यांनी केला आहे. त्यामुळे मागण्यासंदर्भात सुवर्णमध्य निघेपर्यंत आंदोलन चालूच राहणार आहे. तसे स्पष्ट संकेतही आंदोलनकर्त्यांतर्फे विजय पोळे आणि सिद्धेश सुर्लीकर यांनी दिले आहेत.

युनिटी मॉलप्रश्‍नी ‘महालक्ष्मी’वर निर्णय!

युनिटी मॉल आणि प्रशासन स्तंभाविरोधात सुरू असलेल्या उपोषणासंदर्भात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सोमवारी (काल) दिलेल्या संदेशानुसार बुधवारी (ता. २१) ‘महालक्ष्मी’ या शासकीय निवासस्थानी दोन्ही प्रकल्पांवर चर्चा होणार आहे.

या चर्चेसाठी उपोषणकर्त्या चिंबल ग्रामस्थांचे पाचसदस्यीय शिष्टमंडळ, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव आणि आमदार वीरेश बोरकर यांची उपस्थिती असेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mapusa Road Repair: निवडणुका जवळ येताच म्हापशात विकासाचा 'पाऊस', रस्ते कामाला प्रारंभ; 15 वर्षांपासून तुंबलेली गटारे 8 दिवसांत साफ

Anjunem Dam Water Supply: अंजुणेत 21 टक्के जलसाठा! सिंचन, पिण्यासाठी सांभाळून पुरवठा; प्रशासनाकडून नियोजनावर भर!

Kaalsarp Yog 2026: कालसर्प योगाचा अक्राळविक्राळ विळखा! मे महिन्यात 'या' लोकांसाठी धोक्याची घंटा; घाईने घेतलेले निर्णय ठरणार घातक

Goa Atal Asra Scheme : 'अटल आसरा' योजनेत आदिवासींसाठी मोठी वाढ; आता घर बांधणीसाठी मिळणार 5 लाख! सावंत सरकारचा निर्णय

Old Zuari Bridge Closure: प्रवाशांनो लक्ष द्या! शनिवारी जुना झुआरी पूल राहणार बंद, नियमित तपासणीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचा निर्णय; पर्यायी मार्गाचा करा वापर

SCROLL FOR NEXT