Bicholim Mining Protest: पैरातील लोकांचा खाणीविरोधात पुन्हा एल्गार! साळगावकर खाणीचे कामकाज पाडले बंद; प्रलंबित मागण्यांसाठी ग्रामस्थ आक्रमक

Paira Village Mine Protest: गोव्याच्या खाण पट्ट्यात पुन्हा एकदा संघर्षाची ठिणगी पडली असून डिचोली तालुक्यातील पैरा येथील ग्रामस्थांनी खाण कंपनीविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतला.
Paira Village Mine Protest
Paira Village Mine ProtestDainik Gomantak
Published on
Updated on

डिचोली: गोव्याच्या खाण पट्ट्यात पुन्हा एकदा संघर्षाची ठिणगी पडली असून डिचोली तालुक्यातील पैरा येथील ग्रामस्थांनी खाण कंपनीविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतला. आपल्या प्रलंबित मागण्या पूर्ण होत नसल्याने संतापलेल्या स्थानिकांनी साळगावकर खाणीवर धडक दिली. 'आता केवळ आश्वासने नकोत, तर प्रत्यक्ष कृती हवी' असा निर्धार व्यक्त करत ग्रामस्थ रस्त्यावर उतरल्याने खाण परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.

पैरा आणि परिसरातील स्थानिकांनी साळगावकर खाणीच्या मुख्य प्रवेशद्वारावर ठिय्या मांडला. स्थानिक प्रशासन आणि खाण व्यवस्थापनाकडे पाठपुरावा करुनही मूलभूत समस्यांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. खनिज वाहतुकीमुळे गावातील रस्त्यांची झालेली दुरवस्था, धुळीमुळे निर्माण झालेले आरोग्याचे प्रश्न आणि शेतीचे होत असलेले नुकसान यावर तोडगा काढण्याची मागणी ग्रामस्थांनी लावून धरली.

Paira Village Mine Protest
Bicholim: काजूची झाडे मोहोराने बहरली, बागायतदारांची लगबग; मात्र धुके, वाढत्या मजुरीने चिंता

साळगावकर खाणीवरील हे आंदोलन केवळ प्रतीकात्मक नसून तो लोकांच्या संतापाचा उद्रेक असल्याचे दिसून येत आहे. त्याचवेळी, खाण पट्ट्यातील धूळ प्रदूषण आणि जड वाहनांच्या वर्दळीमुळे सर्वसामान्य नागरिकांचे (Citizens) जगणे कठीण झाले आहे. या आंदोलनामुळे खाण कंपनीचे मोठे आर्थिक नुकसान होत असले तरी, ग्रामस्थांनी आपल्या हक्कासाठी ही लढाई आरपारची करण्याचा निर्णय घेतला आहे. जोपर्यंत प्रत्यक्ष जमिनीवर सुधारणा दिसत नाही, तोपर्यंत खनिज वाहतूक सुरु होऊ देणार नाही, असा इशारा पैरा येथील ग्रामस्थांनी दिला. आता खाण व्यवस्थापन काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com