PM Narendra Modi Dainik Gomantak
गोवा

Goa Congress: जखमींची भेट न घेता, बिहारमध्ये प्रचारसभा घेतली; पहलगाम रक्तरंजित असताना PM मोदींना मतं महत्त्वाची - काँग्रेस

Goa Congress Attack On PM Modi: भारत विसरणार नाही, भारत माफ करणार नाही. तसेच, देशाला घोषणा नको आहेत. माणुसकी हवीय, असे पणजीकरांनी म्हटले आहे.

Pramod Yadav

पणजी: निर्दोष नागरिकांचं रक्त पहलगामच्या मातीत मिसळलं असताना, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्राधान्यक्रमात निवडणुका आल्या, सहवेदना नाही. मोदींनी जखमी पीडितांची भेट घेतली नाही. याऐवजी त्यांनी थेट बिहारमध्ये प्रचारसभा घेतली. सत्तेच्या हव्यासापुढे मृतांच्या दुःखाला काही किंमत राहिलेली नाही का?, असा सवाल काँग्रेसचे मीडिया सेलचे प्रमुख अमरनाथ पणजीकर यांनी केला आहे.

"सौदी अरेबियामधून परत आल्यावर पंतप्रधानांनी सर्वपक्षीय महत्त्वाच्या बैठकीत हजेरी लावली नाही, देशवासियांना धैर्य देण्यासाठी कोणतेही भाषण केले नाही, जखमी पीडितांची भेट घेतली नाही. याऐवजी त्यांनी थेट बिहारमध्ये प्रचारसभा घेतली. देशाला नेत्याची गरज असताना एक प्रचारक मिळाला", असा आरोप पणजीकरांनी केला आहे.

देशाला आधार देणाऱ्या व्यक्तिमत्त्वाची गरज असताना एक केवळ नाट्यकर्ता समोर आल्याची टीका पणजीकर यांनी केली. हीच का ती नव्या भारताची घोषणा, जिथे जीवापेक्षा मते महत्त्वाची? आहेत, असा सवाल देखील पणजीकरांनी उपस्थित केला आहे.

भारतीय नागरिक संतप्त असल्याचे म्हणत पणजीकरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तीन प्रश्न विचारले आहेत.

१) पीडितांच्या कुटुंबांपर्यंत पोहोचणे प्राधान्य नसते का?

२) राष्ट्रीय एकतेपेक्षा राजकीय लाभ का महत्त्वाचा?

३) संकटाच्या वेळी नेतृत्व कुठे गायब झाले?

ही शांतता केवळ निराशाजनक नाही, तर लज्जास्पद आहे, असे पणजीकरांनी म्हटले आहे. भारत विसरणार नाही, भारत माफ करणार नाही. तसेच, देशाला घोषणा नको आहेत. माणुसकी हवीय, असे पणजीकरांनी म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Railway Project: 'गोवा कोल हब बनणार नाही...'; रेल्वे दुहेरीकरणावरुन मुख्यमंत्री सावंत यांची ग्वाही, पण वाद कायम

High Court: गोवा सरकारला मोठा झटका; वैद्यकीय, दंत महाविद्यालयातील Sports Quota रद्द

Sara Tendulkar Goa Vacation: सारा तेंडुलकरचे गोवा व्हेकेशनचे फोटो व्हायरल! मिस्ट्री मॅनसोबतच्या जवळीकतेने सोशल मीडियावर चर्चांना उधाण, कोण आहे तो?

Goa News: गोव्यात सरकारी कर्मचारी अजूनही Holiday च्या मूडमध्ये; जनतेची कामे ठप्प

Viral Video: 'पूर नव्हे, अल्लाहचा आशीर्वाद'! पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा पूरग्रस्तांना अजब सल्ला; सोशल मीडियावर व्हिडिओ तूफान व्हायरल

SCROLL FOR NEXT