Sacorda: डोंगरवाडा-साकोर्डात पाणीप्रश्न गंभीर! संतप्त महिलांची पाणीपुरवठा कार्यालयावर धडक; 19 घरांची होतेय फरपट

Dongarwadi Sacorda Water Problem: डोंगरवाडा - साकोर्डा गावात कित्येक दिवसांपासून पिण्याच्या पाण्याची भीषण समस्या निर्माण झाली असून संपूर्ण लोकवस्ती दैनंदिन पाण्यासाठी हैराण झाली आहे.
Water Crisis In Goa
No WaterCanva
Published on
Updated on

तांबडीसुर्ला: डोंगरवाडा - साकोर्डा गावात कित्येक दिवसांपासून पिण्याच्या पाण्याची भीषण समस्या निर्माण झाली असून संपूर्ण लोकवस्ती दैनंदिन पाण्यासाठी हैराण झाली आहे. येथील विहिरीला सार्वजनिक बांधकाम खात्याचा पंप आहे. विहिरीतील पाणी आटल्याने पंप केवळ १०-१५ मिनिटे चालतो.

अशा परिस्थितीत लोकांना जलसंकटाचा सामना करावा लागत आहे. गावात सुमारे १९ घरे असून संपूर्ण लोकवस्ती पंपाच्या पाण्यावर अवलंबून होती. सध्या गावात विहिरीचे पाणी एकदिवसा आड मिळत असल्याचे महिलांनी सांगितले. यापुढे पाण्याविना जगायचे कसे हा प्रश्न डोंगरवाडीवासीयांना सतावत आहे.

डोंगरवाडा येथील महिलांनी टँकरच्या पाण्यासाठी धारबांदोडा येथील पाणीपुरवठा विभागाच्या कार्यालयावर धडक दिल्यानंतर अधिकाऱ्यांना जाग आली. त्यांनी लगेच टँकरची व्यवस्था करून टँकरव्दारे पाणीपुरवठी सुरू केला. पाणी वितरणाचे नियोजन नसल्याने महिलांना कामधंदा सोडून टँकरच्या प्रतीक्षेत रहावे लागते. टँकरची वेळ निश्चित करावी, अशी मागणी महिलांनी केली आहे.

Water Crisis In Goa
Goa Water Crisis: गोव्यातील बहुतांश धरणातील पाण्याची पातळी 40 टक्क्यांच्या खाली, पण सरकार म्हणतंय, 'पिण्याच्या पाण्याची चिंता नको'

दरवर्षी मार्च महिन्यापासून गावातील पाण्याचा प्रश्न उद्भवत असतो. मात्र, संबंधित अधिकाऱ्यांना या समस्येची जाणीव असूनही ते कायमस्वरुपी पाण्याचे व्यवस्थापन करण्यात अपयशी ठरले असल्याचे डोंगरवाडा येथील महिलांनी सांगितले.

टँकरद्वारे गावात पाणीपुरवठा करण्यात येत आहे. हे पाणी कोठून आणले जाते. ते पिण्यासाठी योग्य आहे का? हा महत्त्वाचा प्रश्न महिलांनी उपस्थित करत संबंधित अधिकाऱ्यांनी याबाबतीत गावातील लोकांना काहीच कल्पना दिली नसल्याने लोक टँकरचे पाणी आंघोळ व कपडे धुण्यासाठी करत असल्याचे सांगितले.

Water Crisis In Goa
Indus Water Treaty: ऐतिहासिक सिंधू जल करार काय आहे? भारताने करार स्थगित केल्याने त्याचा पाकिस्तानला कसा फटका बसणार?

विहिरीची खोली कमी

पंप बसवलेली विहिर जुनी असून तिची खोली कमी असल्याने उन्हाळ्यात पाणी लवकर सुकते. त्यामुळे विहिरीची खोली वाढवून द्यावी, अशी मागणी महिलांनी धारबांदोडा येथील पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना केली होती. त्यावेळी गरज पडल्यास नवीन विहीर बांधण्याची व्यवस्था करू, परंतु विहिरीच्या खोलीत वाढ करण्यात येणार नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com