Ravindra Bhavan Margao Fountain
Ravindra Bhavan Margao FountainDainik Gomantak

Ravindra Bhavan: रवींद्र भवनातील कारंजाचे उद्‍घाटन! 58 लाख खर्चून दुरुस्ती, वारंवार डागडुजीचे सत्र थांबणार?

Ravindra Bhavan Fountain: मडगावच्या रवींद्र भवनाचे उदघाटन जुलै २००८ साली झाली होते. तेव्हा रवींद्र भवनच्या मुख्य प्रवेश द्वारावर व आत असे दोन कारंजे बसविण्यात आले होते.
Published on

Ravindra Bhavan Margao Fountain Opening

सासष्टी: रवींद्र भवनाच्या मुख्य प्रवेश द्वारासमोरील कारंजा ५८ लाख रुपये खर्चून दुरुस्त केला असून त्याचे उद्‍घाटन मडगावचे आमदार दिगंबर कामत यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आले. या प्रसंगी रवींद्र भवनचे अध्यक्ष राजेंद्र तालक, उपाध्यक्ष मनोहर बोरकर, भवनच्या कार्यकारी समितीतील सदस्य व कर्मचारी उपस्थित होते.

मडगावच्या रवींद्र भवनाचे उदघाटन जुलै २००८ साली झाली होते. तेव्हा रवींद्र भवनच्या मुख्य प्रवेश द्वारावर व आत संलग्नक इमारतीसमोर, असे दोन कारंजे बसविण्यात आले होते. मात्र, हे कारंजे अधूनमधून बिघडत असत. गेल्या १५ वर्षांपासून हे कारंजे दुरुस्त करणे व नंतर बिघडणे चालू होते. संलग्न इमारतीसमोरील कारंजाची दुरुस्ती करुन तो सुरू करण्यात आला होता. तेव्हा २५ लाखांचा खर्च आला होता.

Ravindra Bhavan Margao Fountain
Ravindra Bhavan Goa : रवींद्र भवनात संगीत, नाट्यकलेचे वर्ग सुरू करण्यात अडचण काय? कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांचा खडा सवाल

हे कारंजे लोकांसाठी आकर्षण ठरेल, असे कामत यांनी यावेळी सांगितले. मडगावच्या रवींद्र भवनच्या जास्तीत जास्त दुरुस्तीचे काम पूर्ण झाले असुन काही मोजकीच कामे पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत. संलग्न इमारतीसंदर्भात जो घोळ होता तो सोडविण्यात आला असून त्याच्या दुरुस्तीच्या आर्थिक मान्यतेसाठी फाईल सरकारकडे असल्याचे कामत यांनी सांगितले.

Ravindra Bhavan Margao Fountain
Canacona, Ravindra Bhavan: काणकोणातील रवींद्र भवनाचा पार पडला उद्घाटन समारंभ; CM सावंतांनी लावली हजेरी

या कारंजाची देखभाल अत्यंत जरुरी असुन त्या साठी आर्थिक तरतूद करणे आवश्यक असल्याचे कामत यानी सांगितले. एकदा संलग्न इमारतीचे व्यवहार पूर्ण झाले की तिथे सांस्कृतिक व मनोरंजनात्मक सुविधा उपलब्ध केल्या जातील, असे राजेंद्र तालक यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com