गोव्यात लहान मुलांना खोकला, तापाचा संसर्ग, पालकांत भिती  Dainik Gomantak
गोवा

डिचोलीत ग्रामीण भागात पावसाळी आजारांची साथ

गोव्यात लहान मुलांना खोकला, तापाचा संसर्ग, पालकांत भिती

दैनिक गोमन्तक

डिचोली-पूरग्रस्त (Bicholim) परिस्थितीतून नागरिक सावरत असतानाच, आता डिचोलीतील बहूतेक ग्रामीण भागात हळूहळू पावसाळी (monsoon diseases) आजारांची साथ फैलावू लागली आहे. ग्रामीण भागात सध्या सर्दी-खोकला तसेच तापाची (Cold-cough fever) साथ फैलावली असून, अनेक लहान मुलांना या साथीची लागण होत आहे. विशेष करून एक ते पाच वर्षापर्यंतच्या मुलांना या साथीची लागण झाल्याचे आढळून येत आहे. (Outbreak of monsoon diseases in rural areas of bicholim)

एकाबाजूने 'कोविड' च्या तिसऱ्या लाटेचा धोका व्यक्त होत असतानाच, लहान मुलांना सर्दी, तापाचा त्रास जाणवू लागल्याने पालकांमध्ये भितीयुक्त वातावरण पसरले आहे. तरी बदलत्या हवामानामुळे ही साथ पसरल्याचे आरोग्य तज्ञांचे म्हणणे आहे. पुरामुळे निर्माण झालेल्या अस्वच्छतेमुळे त्यातच हवामानात बदल झाल्यानंतर पावसाळी आजारांसह रोगराई पसरण्याची भिती व्यक्त करण्यात येत होती. तसे संकेतही आरोग्य अधिकाऱ्यांनी पूरग्रस्त भागातील जनतेला दिले आहेत.

गोव्यात लहान मुलांना खोकला, तापाचा संसर्ग, पालकांत भिती

तपासणीसाठी डॉक्टरांकडे धाव

डिचोली शहरासह तालुक्यातील सर्वण तसेच पुराचा तडाखा बसलेल्या ग्रामीण भागात सध्या सर्दी-तापाची साथ फैलावत असून, अनेक लहान मुलांना या साथीची लागण झाली आहे. साथीची लागण झालेल्या बालकांना घेवून सध्या तपासणीसाठी पालक सामाजिक आरोग्य केंद्रांसह खाजगी डॉक्टरांकडे धाव घेत असल्याचे आढळून येत आहे.

पावसाळी आजार

पुरामुळे निर्माण झालेली अस्वच्छता त्यातच हवामानात बदल झाल्यानंतर सर्दी-ताप आणि अतिसार यासारख्या आजारांची साथ पसरण्याची शक्यता डिचोली सामाजिक आरोग्य केंद्राची आरोग्य अधिकारी डॉ. मेधा साळकर यांनी आठवड्यापूर्वी वर्तविली होती. जनतेने आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहनही त्यांनी केले होते. पूरग्रस्त साळ आदी भागात फॉगिंग करून प्राथमिक औषधांचे वाटपही केले आहे. बदलत्या हवामानामुळे पावसाळी आजार बळावण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली आहे.

वैद्यकीय सल्ला घ्या

हवामानात बदल झाला की, पावसाळी आजार डोके वर काढतात. सध्या लहान मुलांना सर्दी-ताप संसर्गाची लागण होत असली, तरी पालकांनी घाबरून न जाता आणि गाफिल न राहता वैद्यकीय सल्ला घ्यावा. बदलत्या हवामानामुळे सर्दी-तापाची साथ फैलावली आहे.

-डॉ. शेखर साळकर, तज्ज्ञ डॉक्टर.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Porvorim Accident: पर्वरीत भरधाव दुचाकीची पादचाऱ्याला धडक; उपचारादरम्यान मृत्यू

Boeing 737 MAX विमानांना सॉफ्टवेअरचा 'धोका'; लँडिंगवेळी मार्गदर्शन प्रणाली बंद होण्याची शक्यता

El Nino Rabi Crops: 'एल निनो'चा रब्बीला मोठा फटका? केंद्रीय कृषी सचिवांचा इशारा; कोरडवाहू भागांसमोर संकट

ODI World Cup 2027 Schedule: क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! 2027 वनडे वर्ल्ड कपचं शेड्यूल 1 ऑक्टोबरला होणार जाहीर

Goa SIR: 'अल्पसंख्याकांना लक्ष्य केलेले नाही'; SIR वादावर मुख्यमंत्री सावंतांचा दावा, विरोधकांचे आरोप तथ्यहीन

SCROLL FOR NEXT