<div class="paragraphs"><p>Mamata Banerjee</p></div>

Mamata Banerjee

 

Dainik Gomantak 

गोवा

गोव्यातून भाजपला हाकलून देण्यासाठी दिदींचा 'खेळ जातलोच'

दैनिक गोमन्तक

मडगाव: देशातील धार्मिक एकोपा नष्ट करण्यासाठीच राजकारणात उतरलेल्या भाजपला (BJP) गोव्यासह (Goa) आता निवडणूक होत असलेल्या चारही राज्यातून हाकलून लावणे हे आमचे एकमेव ध्येय आहे असे म्हणत त्यामुळे आता या चारही राज्यात 'खेळ जातलोच' असे कोकणीत उच्चारत तृणमुलच्या राष्ट्रीय अध्यक्ष ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी गोवेकरांच्या काळजाला हात घालण्याचा प्रयत्न केला. हे सांगताना त्यांनी फुटबॉल हातात घेऊन तो प्रेक्षकांमध्ये भिरकावून मारला. गोवा आणि बंगाल एकच असा फुटबॉलचा संदर्भ देत त्या म्हणाल्या

बाणावली येथील दांडो मैदानावर त्यांनी चर्चिल आलेमाव आणि त्यांची कन्या वालांका आलेमाव याना तृणमुल पक्षात प्रवेश दिला. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, गोव्यात काँग्रेसला भाजपला हाकलून लावण्यात रस नाही असे दिसून आल्यामुळेच आम्हाला येथे यावे लागले. भाजपला हाकलून लावणे हे आमचे एकमेव उद्दिष्ट आहे. त्यासाठीच गोव्यात आम्ही समविचारी पक्षांकडे युती केली आहे. काँग्रेसला भाजप गोव्यातून जावी असे खरेच वाटत असल्यास त्यांनीही आमच्या बरोबर यावे असे त्या म्हणाल्या.

या सभेला चर्चिल आलेमाव (Churchill Alemao) यांनी बऱ्यापैकी गर्दी जमवून आपले शक्तिप्रदर्शन घडवून आणले. काँग्रेस बरोबर युती करून आगामी निवडणूक लढवावी असा प्रस्ताव राष्ट्रवादी पक्षाच्या राष्ट्रीय नेत्यांनी एक वर्षापूर्वी काँग्रेससमोर ठेवूनही काँग्रेसने त्यावर निर्णय घेतला नाही. काँग्रेसला (Congress) फक्त स्वतःच्या बळावर लढायचे आहे. पण त्यांच्यात ती ताकद नाही. अशा परिस्थितीत भाजपला फक्त तृणमुल पक्षच हरवू शकतो याची खात्री पटल्यानेच आपण या पक्षात प्रवेश केला असे चर्चिल आलेमाव यांनी यावेळी सांगितले.

गोव्याच्या तृणमुलच्या प्रभारी माहुवा मोईत्रा यांनी गोव्यात काँग्रेस भाजपाशी संगनमत करून निवडणूक लढवू पाहत असल्याचा आरोप करून त्यासाठीच आम्हाला गोव्यात लोकांना पर्याय देण्यासाठी उतरावे लागले असे सांगितले. तर अभिषेक बॅनर्जी यांनी गोवेकारांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या आम्हीच पूर्ण करू शकतो असे सांगितले.

यावेळी तृणमूलचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि गोव्याचे माजी मुख्यमंत्री लुईझींन फालेरो यांनी काँग्रेसवर टीका करताना, ज्या पक्षाने लोकांच्या मनाविरुद्ध जाऊन भाजपला सरकार करण्यास आमदारांची रसद पुरविली त्या काँग्रेस पक्षाला दुसऱ्या पक्षावर निधर्मी मतात फूट घालू पाहतात असे म्हणण्याचा अधिकार नाही. गोव्यात जर भाजपचे सरकार सत्तेवर आले तर त्याला काँग्रेसच जबाबदार असा आरोप केला. यावेळी वालांका आलेमाव यांचेही भाषण झाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bardez ODP Stay: बार्देशमधील पाच ‘ओडीपीं’ना स्‍थगिती; खंडपीठाचा आदेश

Loksabha Election : विकसित भारतासाठी मतदान करा! मुख्यमंत्री सावंत

Goa CM On Congress: तीन पिढ्या ‘पीएम’पद लाभूनही सामान्यांसाठी काय केले? प्रमोद सावंत यांचा सवाल

Goa Congress: भाजप सर्व आघाड्यांवर अपयशी, खलपांना लोकसभेत पाठवा; इंडिया आघाडी

Canacona: काणकोणवासीयांनी पल्लवींना पाठबळ द्यावे : मुख्यमंत्री प्रमोद सावंत

SCROLL FOR NEXT