जयंतीनिमित्त भाजपा मंडळातर्फे मनोहर पर्रिकरांना श्रद्धांजली!

वास्को भाजपा गटाध्यक्ष दीपक नाईक रविंद्र भवन बायणाचे अध्यक्ष जयंत जाधव, माजी नगरसेवक कृष्णा (दाजी) साळकर, महिला गटाध्यक्ष सुप्रिया नाईक, नगरसेविका शमी साळकर, नगरसेवक अमेय चोपडेकर, गिरीश बोरकर व इतर भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
BJP

BJP

Dainik Gomantak

Published on
Updated on

वास्को : माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रिकर (Manohar Parrikar) यांच्या जयंतीनिमित्त वास्को (Vasco) भाजपा (BJP) मंडळातर्फे श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करून दिवंगत पर्रिकर यांना श्रद्धांजली वाहून अभिवादन केले. माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांची जयंती भाजपातर्फे सर्वत्र साजरी करण्यात आली. यानिमित्त वास्को भाजप मंडळातर्फे श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन श्री ब्रह्मस्थळ संस्थान पांडुरंगवाडी बायणा येथे करण्यात आले होते. याप्रसंगी वास्को भाजपा गटाध्यक्ष दीपक नाईक रविंद्र भवन बायणाचे अध्यक्ष जयंत जाधव, माजी नगरसेवक कृष्णा (दाजी) साळकर, महिला गटाध्यक्ष सुप्रिया नाईक, नगरसेविका शमी साळकर, नगरसेवक अमेय चोपडेकर, गिरीश बोरकर व इतर भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

<div class="paragraphs"><p>BJP</p></div>
Goa: जायंट्स ग्रुप ऑफ वास्कोच्या सहकार्याने मोफत नेत्र तपासणी शिबीर

सुरुवातीला दीपप्रज्वलन करून तसे स्व. पर्रीकर यांच्या तस्विरीला पुष्प अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी वास्को भाजप गटाध्यक्ष दीपक नाईक यांनी बोलताना पर्रीकर भाई हे विकास पुरुष आहे. त्याने भाजपा कार्यकर्त्यांना दिलेली चालना प्रेरणादायी आहे. आज गोवा राज्य विकासाच्या झोकात आहे ते पर्रिकर भाई मुळे. त्याने अनेक युवा कार्यकर्ता घडवले आहे. यात माझाही आसपाव असल्याचे ते म्हणाले.

त्यांच्या आठवणी सदैव तेवत राहणार असे ते म्हणे म्हणाले. यावेळी कृष्णा साळकर व जयंत जाधव यांनीही स्वर्गीय मनोहर पर्रीकर यांच्या आठवणींना उजाळा देऊन त्यांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली वाहिली. याप्रसंगी उपस्थित कार्यकर्त्यांनी स्वर्गीय पर्रीकर यांच्या तस्विरीला पुष्प वाहून श्रद्धांजली वाहिली. वास्को भाजपा मंडळातर्फे आयोजित स्वर्गीय मनोहर पर्रीकर यांच्या जयंती कार्यक्रमात श्रद्धांजली वाहताना वास्को गटाध्यक्ष दीपक नाईक, जयंत जाधव, कृष्णा साळकर, शमी साळकर, सुप्रिया नाईक व इतर.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Shashank Narvekar Mental Healt
Colvale Jail Holiday Home
Drug Network From Jail
 Supreme Court Stray Dog Directions
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com