Other areas including Panaji received unseasonal rains Dainik Gomantak
गोवा

Goa Weather Update: पणजीसह इतर भागात अवकाळी पावसाची बरसात..

आज गोव्यातील काही ठिकाणी अवकाळी पावसाने आपली हजेरी लावली. पणजीमध्येही मुसळधार पाऊस पडला आहे.

दैनिक गोमन्तक

Goa Weather Update: हवामान खात्याने अंदाज वर्तवल्या प्रमाणे काही राज्यांमध्ये अवकाळी पाऊस पडण्याची शकता होती. आज गोव्यातील काही भागांत पावसाने आपली हजेरी लावली आहे. पर्वरी, बार्देशसोबतच गोव्याचे महत्वाचे शहर पणजीमध्येही मुसळधार पावसाची (Rain in goa) बरसात झाली आहे. पुढील 3-4 तासांत उत्तर गोव्यात काही ठिकाणी आणि दक्षिण गोवा जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. (Other areas including Panaji received unseasonal rains)

अचानक आलेल्या पावसामुळे पणजीमधील नागरिकांची तारांबळ उडाली. गोव्यासोबतच इतर राज्यांमध्येही अवकाळी पाऊस झाला आहे. गोव्यातील डिचोली, म्हापसा, बांबोळी, हळदोण, मये, साखळी या भागात पाऊस पडला आहे. या पावसाचा पिकांवर आणि आरोग्यवरही परिणाम होऊ शकतो. अनियमित वातावरणामुळे हा अवकाळी पाऊस पडल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, अरबी समुद्रातून (Arabian Sea) जोराने वारे वाहण्याची शक्यता असल्याने मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा वेधशाळेने दिला आहे.

सोमवारपासून किमान तापमानात 2 ते 3अंशांनी घट होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने (IMD) वर्तवली आहे. पुढील 3 दिवसांत किमान तापमानात 2-3 अंश सेल्सिअसने घसरण होण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: शापोरा – हणजूण येथून ११ वर्षीय मुलगा दोन दिवसांपासून बेपत्ता, शोध सुरु

Randeep Hooda At IFFI: बिरसा मुंडांच्या जीवनावर सिनेनिर्मिती व्हावी! अंदमान सेल्युलर तुरुंगात गेल्यानंतर मात्र.. ; रणदीप हुडाने मांडले स्पष्ट मत

Goa Politics: अदानी प्रकरणावरुन काँग्रेस-भाजप मध्ये कलगीतुरा! पाटकरांचे आरोप; वेर्णेकरांचे प्रत्युत्तर

Pilgao Farmers Protest: पिळगावात तिसऱ्या दिवशीही ‘रस्ता बंद’; खाण कंपनीच्या भूमिकेकडे ग्रामस्थांचे लक्ष

Vidhu Vinod Chopra At IFFI: 'माझ्या सिनेमाच्या पहिल्या 'शो'ला चार-पाचच प्रेक्षक होते..'; चोप्रांनी सांगिलता 'खामोश'चा दिलखुलास किस्सा

SCROLL FOR NEXT