Oshalbag Dhargalim Advocate Attack Dainik Gomantak
गोवा

Dhargalim: पंचनाम्यासाठी गेलेल्या वकिलाला जमावाकडून मारहाण, धारगळमधील धक्कादायक प्रकार; हल्लेखोरांना अटक करण्याची मागणी

Oshalbag Dhargalim Advocate Attack: सविस्तर माहितीनुसार नीलेश पटेकर यांनी येथील जमिनीत बेकायदेशीर कृत्ये चालत असल्याची तक्रार पंचायत संचालनालयाच्या कार्यालयात केली होती.

गोमन्तक डिजिटल टीम

पेडणे: ओशालबाग - धारगळ येथे सरपंच सरकारी कर्मचारी यांच्यासह जमिनीचा पंचनामा करण्यास गेलेल्या ॲड. सदानंद वायंगणकर यांच्यावर सात जणांच्या जमावाने हल्ला करून जखमी केले.

सविस्तर माहितीनुसार नीलेश पटेकर यांनी येथील जमिनीत बेकायदेशीर कृत्ये चालत असल्याची तक्रार पंचायत संचालनालयाच्या कार्यालयात केली होती. त्यानुसार पंचायत संचनालयातून पेडणे गट विकास कार्यालयात या प्रकरणी पाहणी करण्यासाठी धारगळ सरपंच, पंचायत सचिव पेडणे गटविकास कार्यालयातील अभियंता व एक कर्मचारी गेले होते.

नीलेश पटेकर यांनी यासंबंधी या अधिकारी व कर्मचाऱ्यांसोबत त्यांच्यातर्फे जाण्यासाठी ॲड. सदानंद वायंगणकर यांना परवानगी दिली होती.

त्यानुसार वायंगणकर हे धारगळचे सरपंच अर्जुन कानोळकर, पंचायत सचिव प्रीतम सावंत व अन्य कर्मचाऱ्यांसोबत ओशालबाग - धारगळ येथे गेले असता तिथे आलेल्या सात जणांच्या गटाने वायंगणकर यांच्यावर हल्ला करून त्यांना लाथा बुक्क्याने मारले व जवळ असलेल्या खडीच्या ढिगाऱ्यावर फेकून दिले.

ॲड वायंगणकर यांच्या चेहऱ्याला कानाला व हाताला मार लागला आहे. नंतर ॲड वायंगणकर यांच्यावर तुये येथील सरकारी इस्पितळात उपचार करण्यात आले.

हल्लेखोरांना अटक करा!

दरम्यान, संध्याकाळी गोवा / महाराष्ट्र बार कौन्सिलचे माजी अध्यक्ष संग्राम देसाई यांच्यासह सुमारे वीस वकिलांनी पेडणे पोलिस स्थानकाचे निरीक्षक नितीन हळर्णकर यांची भेट घेऊन ॲड. सदानंद वांयगणकर यांना मारहाण केलेल्या सर्वांना तातडीने अटक करण्याची मागणी केली. संशयितावर कारवाई करण्यात येईल असे पोलिस निरीक्षकांनी त्यांना आश्वासन दिल्याची त्यांनी माहिती दिली.

पटेकर, फर्नांडिसही होते गैरहजर

सहा रोजी धारगळ पंचायत आणि पेडणे गट विकास कार्यालयामार्फत या बेकायदेशीर बांधकामाचा पंचनामा करण्यात सुरुवात केली होती. त्यावेळी तक्रारदार नीलेश पटेकर किंवा ज्यांच्यावर तक्रार केली होती, ते स्टिफन फर्नांडिसही उपस्थित नव्हते. परंतु नीलेश पटेकर यांनी ॲड. वायंगणकर यांना ऑथॉरिटी दिली होती. त्यामुळे ते पटेकर यांच्या वतीने उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT