Dhargalim: कचराफेकूंना चपराक! धारगळ पंचायत ठोठावणार 5 हजारांचा दंड; ग्रामसभेकडे पंच-ग्रामस्थांनी फिरवली पाठ

Dhargalim Gramsabha: सचिव प्रितम सावंत यांनी २०२५-२०२६चे २ कोटी १९ लाख ८२ हजार रुपयांचे अंदाजपत्रक ग्रामसभेसमोर ठेवले. त्यावर चर्चा करून मान्यता देण्यात आली.
Dhargalim Panchayat Meeting
Dhargalim GramsabhaDainik Gomantak
Published on
Updated on

पेडणे: धारगळ पंचायतीच्‍या ग्रामसभेत आज कचऱ्याचा विषय प्रचंड गाजला. पंचायत क्षेत्रात जागोजागी कचऱ्याचे ढीग दिसून येतात. त्‍यामुळे सर्वत्र दुर्गधी पसरली आहे. याकडे ग्रामस्थ पुंडलिक धारगळकर यांनी लक्ष वेधले आणि हा विषय सर्व ग्रामस्‍थांनी लावून धरला.

सकाळी १० वाजता होणारी सभा कोरमअभावी १०.३० वाजता सरपंच दाजी शिरोडकर यांच्या अध्यक्षतेखाली सुरू झाली. सुरवातीलाच कचऱ्याचा विषय आला. पुंडलिक धारगळकर यांनी सांगितले की, बहुतांश भाडेकरू आपल्या घरातील कचरा प्लस्टिक पिशवीत घालून तो रस्त्याच्या बाजूला फेकून देतात. त्यामुळे सर्वत्र दुर्गधी पसरते.

त्यावर सरपंच दाजी शिरोडकर यांनी, यावर काय करता येईल असे विचारले असता ग्रामस्थ प्रकाश धुमाळ यांनी सूचित केले की, अशा लाोकांना पाच हजारांचा दंड ठोठवावा. शेवटी सर्वानुमते हा ठराव संमत करण्यात आला.

सचिव प्रितम सावंत यांनी २०२५-२०२६चे २ कोटी १९ लाख ८२ हजार रुपयांचे अंदाजपत्रक ग्रामसभेसमोर ठेवले. त्यावर चर्चा करून मान्यता देण्यात आली. धारगळ महामार्गावर अपघातांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे ताबडतोब रुग्‍णवाहिका उपलब्‍ध करावी, अशी मागणी करण्‍यात आली. दरम्‍यान, ग्रामसभेत मान्सूनपूर्व कामे, वाढलेली झाडे, गटार, भूमिगत वीजवाहिन्‍या

Dhargalim Panchayat Meeting
Dhargalim Accident: अचानक सिग्नल पडला, 4 गाड्या एकमेकांवर आदळल्या; धारगळ येथे टॅक्सीचा चुराडा, चार पर्यटक जखमी

आदी अनेक विषयांवर चर्चा करण्‍यात आली.

यावेळी झालेल्‍या चर्चेत ग्रामस्थ संदेश कारापूरकर, देविदास नाईक, रमेश कानोळकर, गोविंद सावंत यांनी सहभाग घेतला. पंचसदस्य सतीश धुमाळ, दिलीप वीर, भूषण नाईक, अनिकेत साळगावकर, उपसरपंच दीप्तीक्षा नारोजी यांनी ग्रामस्‍थांना आपल्‍या परीने उत्तरे देण्‍याचा प्रयत्‍न केला.

Dhargalim Panchayat Meeting
Dhargalim: धारगळ येथे ओलित क्षेत्रातील भूभाग कॅसिनोसाठी! स्थानिक, शेतकरी नाराज; LOP आलेमाव यांचे सरकारवर टीकास्त्र

पंचांची ‘दांडी’; ग्रामस्‍थांचीही पाठ

ग्रामसभेला बरेचशे पंचसदस्य गैरहजर असतात. त्यामुळे त्या प्रभागातील ग्रामस्थांना समस्यांवर प्रश्‍‍न विचारण्यास मिळत नाही. त्याचप्रमाणे ग्रामस्थांना ग्रामसभा कधी असते तेसुद्धा कळत नाही. त्यासाठी गाडीवर स्पीकर लावून जनजागृती करावी अशी मागणी करण्यात आली. दरम्‍यान, आजच्‍या ग्रामसभेतला ग्रामस्थांचाही अल्प प्रतिसाद मिळाला. जेमतेम आठ ते दहा ग्रामस्थ उपस्‍थित होते. त्‍यामुळे ग्रामसभा लवकरच आटोपती घ्यावी लागली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com