Orange alert issued by IMD in Goa
Orange alert issued by IMD in Goa  Dainik Gomantak
गोवा

Goa Monsoon: राज्यात 5 आणि 6 ऑगस्ट रोजी ऑरेंज अलर्ट जारी

दैनिक गोमन्तक

गोवा: 3 ऑगस्टपासून उत्तर आणि दक्षिण गोव्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. तसेच 5 आणि 6 तारखेला राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली असुन, ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. दरम्यान, मच्छिमारांना आज पासुन समुद्रात न जाण्याचा इशारा दिलेला आहे.

()

मच्छिमारांना सतर्कतेचा इशारा

राज्यात सोमवारपासूनच नव्या मच्छीमार हंगामाला सुरुवात झाली आहे. मात्र पुढील पाच दिवसांसाठी गोवा तसेच कर्नाटक तटीय मच्छिमारांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पावसाच्या सरींसोबतच 40 कि.मी. प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.

बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळाची उपस्थिती तसेच सध्याच्या स्थानावरून शिअर झोनचे उत्तरेकडे सरकण्याच्या हालचालीमुळे मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता आहे. उद्या व परवा राज्यात पावसाचे प्रमाण कमी असेल. मात्र, शुक्रवार व शनिवारी पाऊस अधिक प्रमाणात असेल, अशी माहिती एम. राहुल यांनी दिली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Abduction Case: राजस्थानच्या व्यक्तीचे माडेल, थिवीतून अपहरण; जीवे मारण्याची धमकी देत लुटमार

Goa Crime News: पर्वरीत आयपीएलवर बेटिंग, गुजरात, युपीच्या 16 जणांना अटक; 15 लाखांचा मुद्देमाल जप्त

Bomb Threat At Dabolim Airport: दाबोळी विमानतळ; अखेर ‘बॉम्‍ब’ची ती अफवाच

Chhattisgarh Naxalites Encounter: सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत सात नक्षलवादी ठार, सर्च ऑपरेशन सुरुच!

Goa Today's Live News: वाळपईत नदीत बुडून एकाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT