Panchayat Election: पराभूत राजकारणी सत्तेचे भुकेलेलेच!

सासष्टीतील राजकारण : चार पंचायतींत उतरविले निकटवर्तीय निवडणूक रिंगणात
Goa Panchayat Elections
Goa Panchayat Elections Dainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: एकदा का सत्तेची चटक लागली की कितीही प्रयत्न केले तरी ती सोडवत नाही हेच खरे. सध्या त्याचा प्रत्यय सासष्टी तालुक्यातील चार ग्रामपंचायतींमध्‍ये येत आहे. तेथे माजी मुख्यमंत्री, माजी मंत्री व माजी आमदार यांच्या सौभाग्यवती वा कन्या रिंगणात आहेत.

(Status of Panchayat Elections in salcete Taluka)

Goa Panchayat Elections
Vishwajit Rane : विश्वजीत राणेंना अज्ञाताकडून व्हॉट्सअप मेसेज

नुवे, बाणावली व वेळ्ळी या मतदारसंघात मोडणाऱ्या नुवे, बेताळभाटी, वार्का व वेळ्ळी या पंचायतींत गत विधानसभा निवडणुकीत मतदारांनी घरी बसविलेल्या राजकारण्यांच्या जवळच्या नातेवाईक रिंगणात आहेत व त्यांचा प्रचार राजकारणी करत आहेत. हे प्रभाग महिलांसाठी राखीव आहेत.

नुवे प्रभाग ४ : येथे नुवेचे माजी आमदार विल्फ्रेड डिसा यांच्या पत्नी फ्रेडा या रिंगणात आहेत. त्या माजी पंच असल्या तरी मध्यंतरीच्या राजकीय घडामोडीमुळे बाबाशान हे स्वतः त्यांच्या प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. विधानसभा निवडणुकीत बाबशान यांना तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते.

बेताळभाटी प्रभाग २ : ही पंचायतही नुवे मतदारसंघात मोडते व माजी मंत्री मिकी पाशेको यांना तिने आजवर हात दिलेला आहे. गतवेळी मिकी पराभूत झाले. त्याचाच वचपा काढण्याच्या इराद्याने असेल, त्यांनी आपल्या सौभाग्यवती व्हियोला यांना प्रभाग २ मधून पंचायत निवडणुकीत उभे केले आहे. तिला पंचायतीत पाठवायचे असा पण त्यांनी केला आहे. विधानसभा निवडणुकीत मिकी पाचव्या क्रमांकावर फेकले गेले होते.

Goa Panchayat Elections
Margao fish market: सोपो कंत्राटाबद्दल सरकारकडून घेणार सल्ला

चर्चिल आलेमाव यांची कन्‍या रिंगणात

बाणावली मतदारसंघातून पराभूत झालेले चर्चिल आलेमांव यांनी वार्का प्रभाग 2 मधून आपली कन्या शेरॉन द कॉस्ता यांना निवडणुकीत उभे करून एक प्रकारे आपल्या वर्चस्वाचा आढावा घेण्याचे ठरविले आहे असे मानले जाते. अजून ते प्रचारासाठी उतरलेले नसले तरी आपल्या समर्थकांशी त्‍यांनी संपर्क साधण्याचा प्रयत्‍न केलेला आहे. असे असले तरी गरज भासली तर मैदानात उतरण्याची तयारी त्‍यांनी ठेवली आहे. विधानसभा निवडणुकीत चर्चिल दुसऱ्या क्रमांकावर फेकले गेले होते

सावियोंची पत्‍नीही आजमावतेय नशीब

गत विधानसभा निवडणुकीत वेळ्ळीतून पराभूत झालेले सावियो डिसिल्वा यांनी वेळ्ळी पंचायतीच्या प्रभाग 9 मधून आपल्या सौभाग्यवती जेझुलीना यांना निवडणुकीत उतरविले तर आहेच पण त्यांच्या प्रचारासाठी ते स्वतः मैदानात आहेत. गेली पाच वर्षे ते वेळ्ळीचे सरपंच होते व म्हणून तेथील राजकारणावर त्यांची पकड असली तरी कोणताच धोका पत्करण्याची त्यांची तयारी नाही. आपण पराभूत झालो असलो तरी सौभाग्यवतीमार्फत राजकारणात दबदबा कायम ठेवण्याची राजकारण्यांची धडपड सुरू आहे. विधानसभा निवडणुकीत सवियो याना दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com