Old Goa Church  Dainik Gomantak
गोवा

Old Goa: ओल्ड गोव्यातील संरक्षित क्षेत्रात होणाऱ्या पोलिस स्थानकाच्या इमारतीला विरोध; जॉन मस्कारेन्हास यांचे राष्ट्रीय स्मारक प्राधिकरणाला पत्र

Old Goa Police Station: संरक्षित क्षेत्रात कोणतेही नवे बांधकाम करण्यास मनाई असल्याचे जॉन यांनी म्हटले आहे. या भागात केवळ सध्याच्या बांधकामात दुरुस्ती करण्याची परवानगी आहे.

Pramod Yadav

पणजी: जुने गोवे येथील संरक्षित क्षेत्रात पोलिस स्थानकाची इमारत उभी राहणार आहे. यासाठी आता विरोध होत आहे. जॉन मस्कारेन्हास यांनी याबाबत नवी दिल्ली येथील राष्ट्रीय स्मारक प्राधिकरणाला पत्र लिहून इमारत बांधकामाची परवानगी रद्द करण्याची मागणी केली आहे.

जुने गोवे येथील संरक्षित क्षेत्रात तळ मजला – पहिला मजला आणि टेरेस अशा ढाचाची इमारत उभी राहणार आहे. ओल्ड गोवा पोलिस स्थानकाची ही इमारत आहे. आला जॉन मस्कारेन्हास यांनी विरोध दर्शवला आहे.

संरक्षित क्षेत्रात कोणतेही नवे बांधकाम करण्यास मनाई असल्याचे जॉन यांनी म्हटले आहे. या भागात केवळ सध्याच्या बांधकामात दुरुस्ती करण्याची परवानगी आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

जॉन यांनी लिहलेल्या पत्राची प्रत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि नगर नियोजन खात्याला देखील पाठविण्यात आली आहे. नगर नियोजनच्या २००८ च्या कलम ६ब १.४ अंतर्गत संरक्षित क्षेत्रात नव्या बांधकामास मनाई असून, त्याची अंमलबजावणी करण्याची मागणी जॉन यांनी केली आहे.

तसेच, कायद्यानुसार सरकारने हेरिजेट साईट म्हणून निश्चित करुन त्याठिकाणी सुरु असलेल्या नव्या बांधकामास मज्जाव करावा, असेही जॉन यांनी म्हटले आहे.

ओल्ड गोव्यातील युनिक हेरिटेजचे संरक्षण करणे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय जबाबदारी असल्याचेही जॉन यांनी पत्रात म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT