Goa: गोव्यातील 10 शिक्षकांना मुख्‍यमंत्री वशिष्‍ठ गुरू पुरस्‍कार जाहीर, शिक्षकदिनी होणार वितरण; वाचा संपूर्ण यादी..

Mukhyamantri Vashishta Guru award: प्रसिद्ध कला शिक्षक राजमोहन शेट्ये, कालिदास सातार्डेकर यांच्‍यासह दहा शिक्षकांना २०२४–२५ मधील मुख्‍यमंत्री वशिष्‍ठ गुरू पुरस्‍कार जाहीर झाले.
Mukhyamantri Vashishta Guru award
Mukhyamantri Vashishta Guru awardDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: प्रसिद्ध कला शिक्षक राजमोहन शेट्ये, कालिदास सातार्डेकर यांच्‍यासह दहा शिक्षकांना २०२४–२५ मधील मुख्‍यमंत्री वशिष्‍ठ गुरू पुरस्‍कार जाहीर झाले.

येत्‍या ५ सप्‍टेंबर रोजी शिक्षक दिनानिमित्त कला अकादमीत आयोजित कार्यक्रमात मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्‍या हस्‍ते या पुरस्‍कारांचे वितरण करण्‍यात येणार असल्‍याचे शिक्षण खात्‍याने स्‍पष्‍ट केले आहे.

वशिष्‍ठ गुरू पुरस्‍कारप्राप्‍त शिक्षकांमध्ये प्राथमिक गटात छाया बोकडे (विठ्ठल रखुमाई सरकारी प्राथमिक शाळा, विठ्ठलापूर–साखळी), कमलाकर देसाई (सरकारी प्राथमिक शाळा, गावठण–पिळये–धारबांदोडा),

माध्‍यमिक गटात मंजिरी जोग (केशव सेवा साधना नारायण झांट्ये स्‍कूल फॉर स्‍पेशल चिल्‍ड्रन), राजमोहन शेट्ये (विस्‍काऊंट ऑफ पेडणे हायस्‍कूल, नानेरवाडा), कालिदास सातार्डेकर (पीएमश्री कामिलो परेरा मेमोरियल सरकारी हायस्‍कूल, सडार–फोंडा), ममता पाटील (आनंदीबाई महानंदू नाईक हायस्‍कूल,

Mukhyamantri Vashishta Guru award
Goa Cabinet: संवेदनशील खात्यांची धुरा CM सावंतांकडे! ‘पुरातत्व, पुराभिलेख’ची जबाबदारी; ‘निर्णायक नेता’ म्हणून होणार प्रतिमा दृढ

करंझाळ – मडकई), विद्यालय मुख्‍याध्‍यापक गटात गुरुदास पालकर (ज्ञानप्रसारक विद्यालय, म्‍हापसा), अरोरा डिसोझा (रोझरी हायस्‍कूल, नावेली), उच्च माध्‍यमिक गटात सुनील शेट (दीपविहार उच्च माध्‍यमिक विद्यालय, हेडलँड - सडा) आणि उच्च माध्‍यमिक मुख्‍याध्‍यापक गटात सिंथिया मारिया बोर्जेस (रामचंद्र महादेव साळगावकर उच्च माध्‍यमिक विद्यालय, कोंब–मडगाव) यांचा समावेश आहे.

Mukhyamantri Vashishta Guru award
Porvorim: ओ कोकेरो ते मॉल दी गोवा रस्ता 5 दिवसांच्या गणेश चतुर्थीनंतरच होणार बंद; CM सावंतांनी केले स्पष्ट

याआधी शिक्षक दिनानिमित्त राज्‍यस्‍तरीय शिक्षक या नावाने पुरस्‍कार देण्‍यात येत होते. परंतु, दोन वर्षांपूर्वी राज्‍य सरकारने हे नाव बदलले आणि ‘मुख्‍यमंत्री वशिष्‍ठ गुरू’ या नावाने पुरस्‍कार देण्‍यास सुरुवात केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com