Goa CM Dr. Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

CM Pramod Sawant: ..त्यांचा हेतू कधीच सफल होणार नाही! 'व्हिडिओं'वरुन मुख्यमंत्र्यांची उद्विग्न प्रतिक्रीया

Goa News: माझी आणि सरकारची प्रतिमा खराब करण्यासाठी समाज माध्यमांवरून काही राजकीय शक्ती खोट्या माहितीचे व्हिडिओ प्रसारीत करीत आहेत; मुख्यमंत्र्यांचा दावा

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Political News

पणजी: माझी आणि सरकारची प्रतिमा खराब करण्यासाठी समाज माध्यमांवरून काही राजकीय शक्ती खोट्या माहितीचे व्हिडिओ प्रसारीत करीत आहेत. हे षड्‌यंत्र रचणारे कोण आहेत, हे सर्व गोमंतकीयांना माहीत आहे आणि राज्यातील जनता त्यावर विश्‍वास ठेवणार नाही. मागील सात-आठ दिवस समाज माध्यमांवर काही व्हिडिओ व्हायरल होत आहेत, अशी उद्विग्नता मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केली.

गोव्याबाहेरील काही मुद्रित प्रसारमाध्यमांनी माझी बदनामी करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. मला पूर्ण माहिती आहे की, हे राजकीय हेतूने करण्यात आले आहे. ते व्हिडिओ पाहिल्यानंतर त्यामागील उद्देश काय आहे, हे स्पष्ट होते. असे व्हिडिओ तयार करण्याचा उद्देश म्हणजे राज्यात चांगल्या पद्धतीने चाललेल्या डबल इंजिन सरकारची बदनामी करून अडथळे आणण्याचा प्रयत्न आहे.

...त्यांचा हेतू कधीच सफल होणार नाही

१ मुख्यमंत्री म्हणाले, की खाण व्यवसायातून आलेल्या जिल्हा खनिज निधीतील पैसा माझ्या संस्थेसाठी घेतलेला नाही, तरीही त्याचा व्हिडिओद्वारे बाऊ केला जात आहे.

२ मागील पाच वर्षांच्या काळात राज्याची आर्थिक स्थिती मजबूत झाली आहे. ४ हजार २०० कोटींचे कर्ज घेण्याची तरतूद असतानाही ती मर्यादा आम्ही ओलांडलेली नाही.

३ आर्थिक बाबी योग्यरितीने तयार केल्याने नीती आयोग किंवा वित्त आयोगाने गोव्याचे कौतुक केले आहे.

४ सर्व गोमंतकीयांनी अशा व्हिडिओंना आणि भूलथापांना बळी पडू नये. कारण त्यांचा राजकीय हेतू कधीच साध्य होणार नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी निक्षून सांगितले.

कमिशन बंद झाल्याने ‘ते’ अस्वस्थ

झुआरी ॲग्रो जमीन घोटाळ्यावर ते म्हणाले की, मी जन्मालाही आलो नव्हतो, तेव्हा सरकारने ही जमीन कोमुनिदादकडून विकत घेऊन ती औद्योगिकीकरणासाठी झुआरी कंपनीला दिली होती. एकंदर पाहिल्यास या जमिनीशी माझा काहीच संबंध नाही. तरीही दलाल वा एजंटांनी ही जमीन विक्री सुरू केली आहे. ते कोण आहेत, हे लोकांना माहीत आहे. कोणाचे कमिशन बंद झाले, कोण कोणाकडे कमिशन मागतात हे थोड्याच दिवसांत उघड होईल, याची मला खात्री आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

The Sabarmati Report: गोध्रा अग्निकांडावर बेतलेला 'द साबरमती रिपोर्ट' गोव्यात टॅक्स फ्री; मुख्यमंत्र्यांची घोषणा

Goa Today's News Live: पाणी जपून वापरा; संपूर्ण बार्देश तालुक्यात दोन दिवस मर्यादीत पाणी पुरवठा

Cash For Job Scam: गोमंतकीयांना लाखोंचा गंडा घालणाऱ्या विषया आणि सोनियाला जामीन मंजूर; मडगाव कोर्टाचा निर्णय

Krittika Nakshatra: गोव्यात कृत्तिका पूजन का करतात? जाणून घ्या धार्मिक महत्व आणि फायदे

युथ काँग्रेसची म्हार्दोळ पोलिस ठाण्यावर धडक, Cash For Job प्रकरणी आक्रमक; मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी!

SCROLL FOR NEXT