LOP Yuri Alemao And Mla Viresh Borkar Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: वीरेश बोरकर म्हणतात, 'मी विरोधी पक्षाचा भाग नाही', आलेमाव म्हणतात 'ते' आहेत; अधिवेशनापूर्वी विरोधक विस्कटले

Goa Assembly Winter Session 2025: गोवा विधानसभेचे हिवाळी अधिवेशन पंधरा दिवसांवर येऊन ठेपले आहे.

Pramod Yadav

Goa Assembly Winter Session 2025

पर्वरी: रिव्हॉल्युशनरी गोवन पक्षाचे एकमेव आमदार वीरेश बोरकर यांनी विधानसभा अधिवेशनापूर्वी ते विरोधकांचा भाग नसल्याचे स्पष्ट केले. पण, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी वीरेश विरोधी पक्षाचाच भाग असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे कोणाचे खरे कोणाचे खोटे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

गोवा विधानसभेचे हिवाळी अधिवेशन पंधरा दिवसांवर येऊन ठेपले आहे. दोनच दिवस होणाऱ्या अधिवेशनावरुन सत्ताधारी भाजपवर टीका होत असताना विरोधकांतील एकजूटीला देखील धक्का बसल्याचे दिसत आहे. रिव्हॉल्युशनरी गोवन पक्षाचे आमदार वीरेश बोरकर यांनी 'एकला चलो रे'चा नारा देत, ते विरोधी पक्षाचा भाग नसल्याचे म्हटले आहे. एखाद्याची कुंडली कशी बाहेर काढायची हे आम्हाला माहितीये, असंही बोरकर म्हणाले.

याबाबत विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांना विचारले असता त्यांनी मात्र वीरेश बोरकर विरोधी पक्षाचाच भाग असल्याचे म्हटले आहे. 'आमदार वीरेश बोरकर विरोधी पक्षात आहेत. मला विश्वास आहे की त्यांनी विविध मुद्दे मांडले आहेत. आमच्यात राजकीय मतभेद असू शकतात पण ते मतभेद बाजूला ठेवून गोव्याच्या हिताचे प्रश्न मांडणे गरजेचे. आमच्याकडे मर्यादित वेळ आहे आणि आपण सर्वांनी एकजूट राहून गोव्याचे प्रश्न मांडले पाहिजेत', असे आलेमाव म्हणाले.

विधानसभेचे अधिवेशन केवळ दोन दिवसापुरते मर्यादित ठेवणे आणि महत्त्वाच्या विषयांवरील चर्चा कमी कालावधीसाठी मर्यादित करणे हा लोकशाहीला मोठा धोका असल्याचे मतही विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी व्यक्त केले आहे.

दरम्यान, पुढील महिन्यात ०६ आणि ०७ फेब्रुवारी रोजी गोवा विधानसभेचे अधिवेशन होणार आहे. अधिवेशन तोंडावर असताना विरोधकांत मात्र एकजुट नसल्याचे दिसत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

Goa Rain Update: गोव्यात जिकडे तिकडे पाणीच पाणी! पावसाचा रौद्रावतार; आपत्कालीन यंत्रणा सतर्क

Rahul Keni: गोव्याचे राहुल केणी बनले BCCIचे सामनाधिकारी! पंच परीक्षेत मिळवला सहावा क्रमांक

Goa Cyber Crime: रिचार्ज पॅक साठी फोन केला, 44 हजार रुपये केले लंपास; गोकुळवाडी-साखळीतील महिलेला गंडा

SCROLL FOR NEXT