Damu Naik, CM Pramod Sawant  Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: 'पोलिस सत्‍य निश्‍चित बाहेर आणतील'! काणकोणकर प्रकरणी विरोधकांचे राजकारण; CM, प्रदेशाध्‍यक्षांचा हल्लाबोल

Rama Kankonkar Attack: रामा काणकोणकर यांच्‍यावर झालेल्‍या हल्ला प्रकरणात सत्ताधारी मंत्र्याचा हात असल्‍याचा आरोप मंगळवारी काँग्रेस आमदार कार्लुस फेरेरा यांनी केला होता.

Sameer Panditrao

पणजी: रामा काणकोणकर हल्ला प्रकरणाचे विरोधक जाणीवपूर्वक राजकारण करीत आहेत. आमचा पोलिस तपासावर विश्‍‍वास असून, पोलिस निश्‍चित या प्रकरणाच्‍या तळापर्यंत पोहोचतील, असा विश्‍‍वास मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि भाजप प्रदेशाध्‍यक्ष दामू नाईक यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना व्‍यक्त केला.

रामा काणकोणकर यांच्‍यावर झालेल्‍या हल्ला प्रकरणात सत्ताधारी मंत्र्याचा हात असल्‍याचा आरोप मंगळवारी काँग्रेस आमदार कार्लुस फेरेरा यांनी केला होता. याबाबत बुधवारी पत्रकारांनी मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना विचारले असता, काही जणांना या प्रकरणाचे राजकारण करायचे आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास योग्‍य पद्धतीने सुरू असून, प्रकरणातील सत्‍य पोलिस निश्‍चित बाहेर आणतील, असे ते म्‍हणाले.

यासंदर्भात भाजप प्रदेशाध्‍यक्ष दामू नाईक यांना छेडले असता, निवडणुका जवळ येत असल्‍यामुळे विरोधक नाहक आरोप करीत आहेत. काणकोणकर हल्ला प्रकरणात मंत्र्याचा हात असेल, तर त्‍याबाबतचे पुरावे त्‍यांनी मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि पोलिसांकडे द्यावेत. विनाकारण त्‍यांनी कुणालाही बदनाम करण्‍याचा प्रयत्‍न करू नये, असे ते म्‍हणाले. आमचा भारतीय लोकशाही, पोलिसांवर पूर्ण विश्‍‍वास आहे. पोलिस या प्रकरणाचा योग्‍य तपास करीत आहेत, असेही नाईक यांनी स्‍पष्‍ट केले.

रामा काणकोणकर हल्ला प्रकरणातील संशयित सुरेश नाईक आपला नातलग असल्‍याचा दावाही विरोधकांकडून केला जात आहे. परंतु, त्‍यात कोणतेही तथ्‍य नाही. हल्ला झाल्‍याचे समजताच भाजप प्रदेशाध्‍यक्ष या नात्‍याने आपण हल्ल्‍याचा तीव्र शब्‍दांत निषेध नोंदवत या प्रकरणातील आरोपींना लवकरात लवकर अटक करण्‍याची मागणीही केली होती, असेही दामू नाईक यांनी नमूद केले.

मंत्र्याचे नाव जाहीर करा; कोड्यात बोलू नका

‘रामा काणकोणकर हल्‍लाप्रकरणात मंत्र्याचा हात आहे’, असे कोड्यात विधान करू नये. आरोप करणाऱ्यांनी नाव घ्‍यावे’, असे प्रतिआव्‍हान वीजमंत्री सुदिन ढवळीकर तसेच मंत्री सुभाष फळदेसाई यांनी दिले आहे; तर माजी मंत्री दिलीप परुळेकरही पोटतिडकीने व्‍यक्‍त झाले आहेत.

काणकोणकर प्रकरणात एक मंत्री गुंतला असल्‍याचे दावे आमदार फेरेरा व व्‍हिएगश यांनी केले आहेत. त्‍यावर पत्रकारांनी ढवळीकर यांना छेडले असता, त्‍यांनी वरील विधान केले. मंत्रिमंडळात एकूण बाराजण आहेत. त्‍यामुळे मोघम आरोप हे मंत्र्यांच्‍या छबीवर प्रश्‍‍नचिन्‍ह निर्माण करत आहेत. या पार्श्वभूमीवर ढवळीकर यांनी बेछुट आरोप करणाऱ्यांचा समाचार घेतला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Opinion: ‘गोंयकारांनी’ घरांसाठी सरकारी दयेवर अवलंबून राहावे का?

Diwali In Goa: 'तिखशे फोव, वझ्या’त खाजीचे लाडू, फेणोरी, चुरमो'! गोव्यातील आगळीवेगळी दिवाळी

Ravi Naik: गोव्याच्या राजकारणाला वळण देण्याची हिकमत असलेला नेता 'रवी नाईक'

Diwali 2025: ..पूर्वी सुकलेल्या गवतापासून नरकासूर बनायचा, गुराख्याच्या सेवेसाठी समर्पित केलेला गोडवा पाडवा; गोव्यातील दिवाळी

Goa Accident: पेडणेजवळ थरार! महिंद्रा कार खांबावर आदळली, गाडीचा चक्काचूर; नवरा-बायको गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT