Rama Kankonkar: डोळ्यांतून रक्त, कमरेखाली त्राण नाही, शरीरावर मारहाणीच्या खुणा; 7 दिवसानंतर कशी आहे काणकोणकरांची प्रकृती?

Rama Kankonkar Case: बेडवर शांतपणे पडून असलेल्‍या काणकोणकरांना उपचारांना सात दिवस झाले तरीही बोलताना त्रास होतो. त्‍यांना केबल्‍सनी केलेल्‍या मारहाणीचे व्रण अजूनही त्‍यांच्‍या छातीवर दिसून येतात.
Rama Kankonkar
Rama Kankonkar Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: बेडवर शांतपणे पडून असलेल्‍या काणकोणकरांना उपचारांना सात दिवस झाले तरीही बोलताना त्रास होतो. हल्लेखोरांनी त्‍यांना केबल्‍सनी केलेल्‍या मारहाणीचे व्रण अजूनही त्‍यांच्‍या छातीवर आणि गुद्द्यांचे ठसे चेहऱ्यावर स्‍पष्‍टपणे दिसून येतात.

मारहाणीवेळी उजव्‍या डोळ्यांतून रक्त गळत होते. तो डोळा सुजला होता. तेथील सूज थोडी कमी झाली आहे. परंतु, डोळा लालसर असून त्‍यांना त्‍या डोळ्यातून समोरील व्‍यक्ती स्‍पष्‍टपणे दिसत नसल्‍याचे लगेच समजून येते. पोट, पाठ आणि शरीराच्‍या खासगी भागांवर हल्लेखोरांनी लाथाबुक्क्‍यांनी मारहाण केली. त्‍यामुळे त्‍यांच्‍या कमरेखालील भागात अजूनही त्राण नसल्‍याचे दिसून आले.

सामाजिक कार्यकर्ते रामा काणकोणकर यांच्‍यावर गेल्‍या गुरुवारी झालेल्‍या जीवघेण्‍या हल्ल्‍याने राज्‍यात खळबळ माजली. या प्रकरणी अट्टल गुन्‍हेगार जेनिटो कार्दोजसह आठ जणांना अटक केली असून, ते पोलिस कोठडीत आहेत.

Rama Kankonkar
Rama Kankonkar Assault: 'त्या मंत्र्याचे नाव जाहीर करा, कोड्यात काय बोलता...' रामा काणकोणकर हल्ला प्रकरणात सुदिन यांचं प्रतिआव्हान

परंतु, ‘गोमेकॉ’त उपचार घेत असलेल्‍या रामा काणकोणकर यांची प्रकृती पुरती सुधारली नसतानाही त्‍यांना लवकर डिस्‍चार्ज देण्‍याचे प्रयत्‍न ‘गोमेकॉ’च्‍या डॉक्‍टर्सकडून सुरू असल्‍याच्‍या वृत्ताने सरकारच्‍या भूमिकेवर प्रश्‍‍नचिन्‍ह उपस्‍थित झाले होते. परंतु, काणकोणकरवर पुढील काही दिवस उपचार सुरू ठेवण्‍याचा निर्णय ‘गोमेकॉ’ ने घेतल्‍याने आक्रमक झालेले सामाजिक कार्यकर्ते बुधवारी शांत झाले. या पार्श्वभूमीवर ‘गोमन्‍तक’च्‍या प्रतिनिधीने रामा यांच्‍या प्रकृतीची पाहणी केली.

Rama Kankonkar
Rama Kankonkar: '..तर गोमेकॉबाहेर खाट घालून उपचार करु'! काणकोणकरांच्या डिस्‍चार्जबाबत कार्यकर्ते अस्‍वस्‍थ; निर्णयावरुन संशय

मनावर खोल परिणाम...चेहऱ्यावर भय!

करंझाळे–पणजीतील हॉटेलमध्‍ये भोजनासाठी गेलेल्‍या रामा काणकोणकर यांच्‍यावर हल्ला झाला त्‍यावेळी ते बेसावध होते. अचानक झालेला हल्ला आणि हल्लेखोरांनी केलेल्‍या मारहाणीचा त्‍यांच्‍या मनावर खोलवर झालेला परिणाम त्‍यांना पाहताक्षणीच दिसून येतो. आक्रमक वृत्तीच्‍या रामा काणकोणकर यांच्‍या चेहऱ्यावर झळकत असलेले भय पाहून ‘माणूस’ इतका क्रूर असू शकतो? असा प्रश्‍‍न मनात पिंगा घालू लागला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com