Goa Politics: व्‍हेंझी, विरियातोंविरोधात पोलिस तक्रार, भाजप कार्यालयात घुसखोरी केल्‍याचा आरोप

BJP office intrusion Panaji: भाजपच्या कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आमदार व्‍हेंझी व्हिएगस व खासदार विरियातो यांच्याविरोधात भारतीय जनता युवा मोर्चाने पोलिसांत तक्रार दाखल केली.
Venzy Viegas, Viriato Fernandese
Venzy Viegas, Viriato FernandeseDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: येथील भाजपच्या कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी विरोधी आमदार व्‍हेंझी व्हिएगस व खासदार कॅ. विरियातो फर्नांडिस यांच्याविरोधात भारतीय जनता युवा मोर्चाने आज पणजी पोलिसांत तक्रार दाखल केली. भाजयुमो प्रदेशाध्यक्ष तुषार केळकर यांनी नंतर पत्रकारांना ही माहिती दिली.

केळकर म्हणाले, आंदोलन एका विशिष्‍ट जागी होते. तेथील आंदोलकांच्या मदतीने भाजप कार्यालयात घुसखोरी करण्यात आली. त्याबाबत चौकशी करून कारवाई करावी अशी तक्रार आम्‍ही पोलिसांत केली आहे. ही तक्रार रामा काणकोणकर हल्लाप्रकरणावरून लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी अजिबात नाही. कारण त्या प्रकरणी पोलिस तपास सुरू आहे. हे प्रकरण वेगळे आहे.

लोकप्रतिनिधीने जमावाला भडकावले. त्यांना भाजप कार्यालयावर चालून जाण्यास भाग पाडले. तेथे केवळ दोन-तीन कर्मचारी व काही महिला कार्यकर्त्या होत्या. अशा वेळी तेथे जाऊन दरवाजे जोरजोराने ठोठावले. भाजप नेत्यांना ‘घाबरट’ असे संबोधले. अर्धा तास महिला कर्मचाऱ्यांना व कार्यकर्त्यांना कोंडून घेऊन आत रहावे लागले, असे केळकर यांनी सांगितले. दरम्यान, खासदार विरियातो म्हणाले.

भाजप कार्यालयात घुसलेलो नाही. शिवाय त्या इमारतीत भाजप कार्यालय कोणत्या मजल्यावर आहे, हेसुद्धा माहीत नाही. इमारतीच्या दुसऱ्या मजल्यापर्यंत गेलो. तेथे काहींनी भाजप कार्यालय आणखी वरच्या मजल्यावर आहे असे सांगितले. तेथपर्यंत गर्दीमुळे पोचणे शक्य झाले नाही. काँग्रेस हाऊसच्या फलकावर भाजपकडून शाई फेकण्‍यात आल्‍याने मी भाजप कार्यालयाकडे वळलो. निदान पोलिस तक्रारीमुळे तरी हा विषय ताजा राहील अशी आशा आहे.

Venzy Viegas, Viriato Fernandese
Goa Politics: 'वेन्झी, 3 दिवसांत माफी मागा'! आमदार साळकरांची मागणी; हलक्यात न घेण्याचा दिला इशारा

भाजयुमाचे प्रदेशाध्यक्ष तुषार केळकर, म्हणाले, रामा काणकोणकर यांच्यावरील भ्याड हल्ल्याचा आम्ही निषेध करतो. त्यांची प्रकृती लवकर सुधारावी अशी आमची प्रार्थना. पोलिसांनी या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन त्‍यात गुंतलेल्यांना सर्वांना पकडावे. रामा यांच्यासोबत आम्ही आहोत.

Venzy Viegas, Viriato Fernandese
Goa Politics: खरी कुजबुज; दोतोर, भांगर सवाय कर

वाईट कृत्‍य केले तर परिणामही भोगावेत!

भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनीही भाजयुमोच्या पवित्र्याला पाठिंबा दिला आहे. ‘व्‍हेंझी भाजप कार्यालय असलेल्या इमारतीत तिसऱ्या मजल्यावर काय चणे खाण्यासाठी गेले होते?’ असा प्रश्‍‍न त्‍यांनी केला. राजकारण प्रत्येकाने जरूर करावे, पण ते करण्याची एक मर्यादा असते. दुसऱ्या पक्षाच्या कार्यालयात घुसण्याची परंपरा गोव्यात नाही. चुकीचे पायंडे घातले जाऊ नयेत. ज्यांनी असे कृत्य केले असेल त्यांनी त्याचे परिणाम भोगण्यासही तयार रहावे. दुसऱ्यांना ‘भित्रे’ म्हणून डिवचल्यानंतर ते चालून आले तर सामोरे जाण्याची तयारी ठेवावी, असेही दामू नाईक म्‍हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com