CM on terrorism and religion Dainik Gomantak
गोवा

Operation Sindoor: "ऑपरेशन सिंदूर कुठल्याही धर्माविरोधात नाही" मुख्यमंत्र्यांकडून स्पष्टीकरण

CM statement Operation Sindoor: गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी देखील हल्ला झाल्यानंतर भारतीय सेना तसंच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केलं होतं

Akshata Chhatre

पणजी: भारताने पाकिस्तानवर हवाई हल्ला केल्यानंतर जगभरातून भारताने दहशदवादा विरोधात केलेल्या कारवाईचं कौतुक केलं जात आहे. गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी देखील हल्ला झाल्यानंतर भारतीय सेना तसंच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केलं होतं.

"ऑपरेशन सिंदूर धर्माविरोधात नाही!"

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी भारताने केलेला हा हवाईहल्ला कुठल्या एका धर्माविरुद्ध नसून केवळ दहशदवादाच्या विरोधात उचलेलं ठोस पाऊल असल्याचं स्पष्ट केलं आहे. हा हल्ला मुस्लिम धर्माविरोधात नसल्याचं भारताने हल्ल्याची माहिती देण्यासाठी कॉ. सोफिया खुरेशी यांना देण्यात आली होती. भारत कुठल्याही धर्माच्या विरोधात नाही, केवळ आतंकवादाच्या विरोधात असल्याचं मुख्यमंत्री म्हणलेत.

"ऑपरेशन सिंदूर म्हणजे स्त्रीशक्तिचं दर्शन"

पहलगाम येथे झालेल्या दहशदवादी हल्ल्यात केवळ पुरुषांवर निशाण साधण्यात आला होता. कित्येक महिलांचं कुंकू एका दिवसांत पुसलं गेलं होतं. यांचं प्रतिउत्तर देण्यासाठी म्हणून भारताने हवाईहल्ला केला आहे.

दहशदवाद्यांनी एका महिलेला "मोदींना जाऊन सांग" असं म्हणत जीवंत सोडलं होतं आणि हल्ल्यानंतर भारताने देखील कॉ. सोफिया खुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी हल्ल्याची माहिती संपूर्ण जगाला दिली, त्यामुळे ऑपरेशन सिंदूर म्हणजे स्त्रीशक्तिचं दर्शन असल्याचं मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले आहेत.

पाकिस्तानला आणखीन एक मोठा धक्का

भारताने ऑपरेशन सिंदूरच्या अंतर्गत केलेल्या हवाई हल्ल्यानंतर आता गुरुवार (दि.८) रोजी पाकिस्तानला आणखीन एक मोठा धक्का बसलाय. ऑपरेशन सिंदूरमधून सावरत असलेल्या पाकिस्तानमध्ये गुरुवारी आणखीन पंधरा मोठे हल्ले झाल्याची बातमी समोर आली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार पाकिस्तानात सलग सहा ठिकाणी बॉम्बस्फोट झालेत मात्र हे स्फोट कोणी केलेत याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT