
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला म्हणून पाकिस्तानविरोधात भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत चोख प्रत्युत्तर दिले. यातच आता, भारताला आणखी एक मोठे यश मिळाले आहे. कंधार आयसी-814 विमान अपहरण प्रकरणाचा सूत्रधार रौफ अझहर एका हल्ल्यात मारला गेल्याचे वृत्त आहे. बुधवारी (7 मे) रौफ अझहर ऑपरेशन सिंदूरमध्ये मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्काराचे नेतृत्व करताना दिसला होता. तसेच, लाहोर येथे असलेली पाकिस्तानची हवाई संरक्षण यंत्रणा भारताने उद्ध्वस्त केली.
पहलगाम हल्ल्यानंतर भारताकडून सांगण्यात आले होते की, दहशतवाद्यांच्या घरात घुसून त्यांना आम्ही संपवू. रौफचा मृत्यू हे याचे आणखी एक उदाहरण आहे. उरी आणि पुलवामा हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने (Indian Army) यापूर्वीही हवाई हल्ल्यांचे प्रात्यक्षिक दाखवले आहे. रौफच्या हत्येनंतर आता मसूद अझहरलाही मारले जाऊ शकते अशी अटकळ बांधली जात आहे.
ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानातील (Pakistan) बहावलपूर येथील जैश-ए-मोहम्मदच्या मुख्यालयावर भारतीय हवाई हल्ल्यात मसूद अझहरच्या कुटुंबातील 10 सदस्यांचा मृत्यू झाला. काही अहवालांमध्ये अझहर गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात आले. पण बुधवारी तो भारताच्या लष्करी कारवाईत मारलेल्या दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कासाठी आला होता. आता अशी बातमी समोर येत आहे की, तो मारला गेला आहे. रौफ अझहरचा मृत्यू हा दहशतवाद्यांसाठी मोठा धक्का मानला जात आहे, कारण तो कंधार आयसी-814 अपहरणासह भारतावरील अनेक हल्ल्यांसाठी जबाबदार होता.
7 मे रोजी भारताने ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तान आणि पीओकेमधील नऊ दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले. या हल्ल्यात सुमारे 100 दहशतवादी मारले गेल्याचे वृत्त आहे. या हल्ल्यानंतर पाकिस्तान आणि त्याच्या दहशतवादी हेतूंना मोठा धक्का बसला आहे. तसेच, भारतातील अनेक शहरांवर ड्रोन हल्ले झाले आहेत, ज्यामध्ये पाकिस्तानचे मोठे नुकसान झाल्याचे वृत्त आहे.
दुसरीकडे, लाहोर येथील पाकिस्तानची हवाई संरक्षण यंत्रणा भारताने उद्ध्वस्त केली आहे. गुरुवारी (8 मे) लाहोरपासून कराचीपर्यंत अनेक मोठ्या शहरांमध्ये वारंवार ड्रोन हल्ले होत असताना भारताने ही कारवाई केली. पाकिस्तान सरकारच्या म्हणण्यानुसार, आतापर्यंत 25 ड्रोन हल्ले झाले आहेत. लाहोर, कराची आणि रावळपिंडीमध्ये 3 मोठे ड्रोन हल्ले झाले आहेत.
दरम्यान, या ड्रोन हल्ल्यानंतर पाकिस्तानची हवाई संरक्षण यंत्रणा पूर्णपणे अपयशी ठरल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे, बुधवारी (7 मे) पाकिस्तानच्या संसदेत पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी पाकिस्तानी हवाई दलावर स्तुतीसुमनांचा वर्षाव केला होता. शाहबाज म्हणाले होते की, 'पाकिस्तानी हवाई दल खंबीरपणे या युद्धजन्य परिस्थिती लढत आहे.' पंतप्रधानांच्या कौतुकानंतर लगेचच, असीम मुनीर यांनी पाकिस्तानी हवाई दल प्रमुखांची भेट घेतली होती.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.