Cyber crime investigation related to an online investment fraud case in Ponda, Goa Dainik Gomantak
गोवा

Goa Cyber Crime: फोंड्यात ऑनलाईन भामट्यांचा मोठा धुमाकूळ! अवघ्या 6 महिन्यांत नागरिकांना 15 लाखांचा गंडा, गुंतवणुकीच्या नावाखाली मोठी फसवणूक

Goa Online Investment Fraud: ज्यादा पैशांचा परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून नागरिकांना लुबाडण्याचे ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार राज्यात वाढत आहेत.

दैनिक गोमन्तक डिजिटल

फोंडा: ज्यादा पैशांचा परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून नागरिकांना लुबाडण्याचे ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार राज्यात वाढत आहेत. फोंडा तालुक्यात गेल्या सहा महिन्यांत अशा फसवणुकीच्या घटनांमधून नागरिकांनी तब्बल १५ लाख रुपये गमावले आहेत.

फोंडा आणि म्हार्दोळ पोलिस स्थानकात ऑनलाईन फसवणुकीच्या तक्रारी दाखल होण्याचे प्रकार वाढले असून म्हार्दोळ पोलिस स्थानकात सर्वात जास्त प्रकरणांची नोंद झाली आहे. गेल्या आठवड्यात तर दोघाजणांनी अशा तक्रारी केल्या आहेत, ज्यातून साडेपाच लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे म्हटले आहे.

फोंडा आणि म्हार्दोळ मिळून हा फसवणुकीचा आकडा किमान पंधरा लाख रुपये असून यातील काहीजणांनी लाजेपोटी तक्रारी करण्याचे सोडून दिले आहे. म्हार्दोळ पोलिस स्थानकात गेल्या ८ तारखेला व नंतर १२ तारखेला असा प्रकार घडल्याची नोंद झाली आहे. विशेषतः माशेल भागातील लोक जे परप्रांतीय आहेत, अशा ऑनलाईन प्रकरणांत बळी पडत आहेत.

‘१९३०’वर करा संपर्क

केंद्र सरकारने अशी फसवणुकीची प्रकरणे गंभीरपणे घेतली असून ऑनलाईन फसवणूक झाल्यास ‘१९३०’ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात येत आहे. यावर मार्गदर्शन आवश्यक आहे.

काही वर्षांपूर्वी पाच वर्षांत पैसे डबल करून मिळतील, अशी जाहिरताबाजी करून लोकांकडून ठेवी जमा केल्यानंतर अशा ठेवी घेऊन पोबारा करण्याचा प्रकार घडले होते. आता ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार वारंवार होत असून लोक काही सुधारत नाहीत.

- विराज नाईक, कुर्टी-फोंडा

चोरट्यांकडून चोरीच्या नवनव्या क्लृप्त्या शोधून काढल्या जात आहेत. त्यामुळे ग्राहकांनी सावध राहिले पाहिजे. अशा फसवणुकीच्या प्रकरणांवरील जागृतीत युवावर्गाचा भरणा असल्यास या युवकांकडून आपले घर आणि वाड्यावर जनजागृती होणे शक्य आहे.

- नरेश नाईक, ढवळी-फोंडा

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT