Cyber Crime: 'इन्‍स्‍टाग्राम'वरील मैत्री, ॲप गुंतवणूक आमिषाचे तीन बळी! नावेली, माशेलातील तिघांना 8.86 लाखांचा ऑनलाईन गंडा

Instagram Friendship Scam: १८ मार्च ते ३१ मे २०२६ या कालावधीत डिजिटल भामट्याने नावेली एका महिलेसोबत ‘इन्स्टाग्राम’वर ओळख वाढवली.
Instagram Friendship Scam
Cyber CrimeDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: ‘इन्स्टाग्राम’वरील मैत्री, मोबाईल ॲप आणि ऑनलाईन गुंतवणुकीच्‍या नावाखाली डिजिटल भामट्यांनी राज्‍यातील तिघांना ८.८६ लाख रुपयांना गंडा घातल्‍याच्या घटना नावेली आणि माशेल परिसरात घडल्याने एकच खळबळ उडाली आहे.

१८ मार्च ते ३१ मे २०२६ या कालावधीत डिजिटल भामट्याने नावेली एका महिलेसोबत ‘इन्स्टाग्राम’वर ओळख वाढवली. चॅटिंगद्वारे त्‍याने तिच्याशी जवळीक साधत तिचा मोबाईल क्रमांक घेतला. त्‍यानंतर दोघांत मोबाईलद्वारे संभाषण सुरू झाले. काही दिवसांनी आपल्‍याला पैशांची खूप गरज असल्याचे सांगत त्‍याने संबंधित महिलेकडे पैशांची मागणी केली. त्‍याच्‍यावर विश्‍‍वास ठेवून पीडितेने

Instagram Friendship Scam
Karanzalem Land Scam: करंझाळे जमीन घोटाळा: 'ईडी'चे आरोपपत्र; पाचजणांवर कारवाई, बनावट कागदपत्रांद्वारे फसवणुकीचा आरोप

वेळोवेळी विविध बँक खाती तसेच युपीआय आयडीवरून त्‍याला ३.३८ लाख रुपये पाठवले. पैसे मिळाल्‍यानंतर मात्र त्‍याने पीडितेशी बोलणे बंद केले. शिवाय तिला तिची रक्कमही परत केली नाही. फसवणूक झाल्‍याचे लक्षात येताच तिने मडगाव पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी याप्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा नोंद केला असून, पोलिस पुढील तपास करीत आहेत.

ऑनलाईन फसवणुकीचे दुसरे प्रकरण नावेली येथेच घडले. मोबाईलवर ‘कुकू टीव्ही’ या नावाचे अ‍ॅप डाऊनलोड करण्याच्या प्रयत्नात हॅर्कुलस रिबेलो या ५५ वर्षीय इसमाला सायबर ठगाने १.९६ लाखांना लुटले. २० मे रोजी रिबेलो हे मोबाईलवर स्क्रोलिंग करत असताना त्यांना ‘कुकू टीव्ही’चे एपीके स्वरूपातील अ‍ॅप दिसले. त्यांनी त्यावर क्लिक करताच ते अ‍ॅप डाऊनलोड होण्यास सुरुवात झाली. संशय आल्याने त्यांनी तातडीने प्रक्रिया थांबविण्याचा प्रयत्न केला.

Instagram Friendship Scam
Cyber Crime: 'पार्टटाईम नोकरी'च्या आमिषाने 3.69 लाखांचा गंडा; कोरगावातील युवतीची पोलिसांकडे फसवणुकीची तक्रार

मात्र, त्यानंतर त्यांचा मोबाईल हँग झाला. या संधीचा फायदा घेत अज्ञात भामट्याने ॲपद्वारे रिबेलो यांच्‍या बँक खात्यातील १.९६ लाख रुपये काढले. तसेच एपीके फाईलही मोबाईलमधून हटविली. याप्रकरणी रिबेलो यांनी मडगाव पोलिस स्‍थानकात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी अज्ञातावर भारतीय न्याय संहितेच्या ३१८ (४) कलमाखाली गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक अरुण गावस देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक समीर गावकर पुढील तपास करीत आहेत.

तिसऱ्या प्रकरणा मूळ कर्नाटक येथील पण सध्या माशेल येथे राहणाऱ्या शमीर देवगिरी याला भामट्याने साडेतीन लाखांना गंडा घातला असून याप्रकरणी म्हार्दोळ पोलिस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे. म्हार्दोळ पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली असून अज्ञाताविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे.

Instagram Friendship Scam
Thivim Land Scam: थिवी जमीन गैरव्यवहार प्रकरण; सुलेमान सिद्दीकीला जामीन मंजूर, पोलिसांना 'सीएफएसएल' सादर करण्यात अपयश

शमीरने फेसबूकवर आलेल्या एका जाहिरातीनुसार, एका बँक खात्यात पैसे गुंतवले. हा पैसे गुंतवण्याचा प्रकार १ जानेवारी २०२५ ते ६ जुलै २०२६ असा तब्बल दीड वर्ष चालला. शमीरने थोडे थोडे करून तीन लाख ५२ हजार रुपये गुंतवले.

भामट्याने ऑनलाईनवर शमीरला मोठ्या रकमेचे आमिष दाखविले होते. दीड वर्षानंतर पैसे परत मिळवण्यासाठी शमीरने प्रयत्न केला असता संबंधित भामटाच गायब झाला. शिवाय बँक खाते बनावट असल्याचे लक्षात आल्यावर फसलो गेल्याचे समजल्यानंतर शमीरने म्हार्दोळ पोलिस स्थानकात तक्रार नोंदवली. या तक्रारीनुसार म्हार्दोळ पोलिस तपास करीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com