onion price in Panaji market Dainik Gomantak
गोवा

Goa Onion Price: कांदा पुन्हा रडवू लागला! पणजी बाजारात किलोमागे 70 रुपये, फलोत्पादन महामंडळाकडून 58 रुपयांत विक्री

Goa onion price latest news: राज्यासह शेजारील बेळगावमध्येही सध्या मागणीनुसार कांद्याची आवक होत नसल्याने त्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: राज्यासह शेजारील बेळगावमध्येही सध्या मागणीनुसार कांद्याची आवक होत नसल्याने त्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. पणजी बाजारात कांदा ७० रुपये किलो दराने विकला जात असून, सर्वसामान्य नागरिकांना रास्त दरात कांदा उपलब्ध व्हावा यासाठी फलोत्पादन महामंडळाकडून ५८ रुपये किलो दराने त्याची विक्री केली जात आहे.

इतर भाज्यांच्या तुलनेत कांद्याचे दर मोठ्या प्रमाणात वाढल्याने सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघराचे बजेट कोलमडले आहे. त्‍यामुळे सर्वसामान्यांच्या डोळ्यांत पाणी येऊ लागले आहे. सामान्यतः अतिवृष्टी किंवा अवकाळी पावसामुळे कांद्याचे पीक खराब होऊन आवक घटते. मात्र, यंदा पावसाने काही काळ ओढ दिल्याने कांद्याचे पीक काढण्यास काहीसा विलंब झाला आहे.

यंदा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले नसल्याने आगामी काळात कांद्याची आवक वाढून दर पुन्हा स्थिर होण्याची शक्यता विक्रेत्यांनी व्यक्त केली आहे. सध्या कर्नाटकातील घाऊक बाजारात कांदा ५८ ते ६० रुपये किलो दराने विकला जात आहे. त्यानंतर वाहतूक व अन्य खर्च मिळून गोव्यात किरकोळ बाजारात त्याचा दर ७० रुपयांपर्यंत पोहोचत आहे.

सणासुदीत दर चढेच राहण्याची शक्यता

राज्यात सणासुदीचा काळ सुरू असतानाच कांद्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. गणेश चतुर्थीनंतर येणाऱ्या दसरा आणि नवरात्रोत्सवाच्या काळातही कांद्याचे दर ५० रुपये किलोपेक्षा अधिक राहण्याची शक्यता विक्रेत्यांनी व्यक्त केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Navpancham Rajyog 2026: शनि-मंगळाच्या नवपंचम राजयोगाची कमाल! 'या' 3 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस; होणार तगडा धनलाभ

UPI MDR Charge: ऑनलाइन पेमेंट करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, युपीआय पेमेंटवर एमडीआर चार्ज लावण्याचा निर्णय दिवाळीपर्यंत रद्द; NPCI चा मोठा निर्णय

8th Pay Commission Updates: केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार भरघोस वाढ? आयोगाच्या 5 मोठ्या अपडेट्सवर सर्वांचं लक्ष; 'फिटमेंट फॅक्टर'चं सोप्या भाषेत गणित

Goa Cricket: आर्यन नार्वेकरची कर्णधाराला साजेशी खेळी! गोव्याची बडोद्याविरुद्ध 4 बाद 227 धावांपर्यंत मजल

Ranji Trophy: गोव्याची गोलंदाजी पुन्हा निष्प्रभ! बडोद्याचा 472 धावांचा डोंगर; अतीत शेठचे शतक एका धावेने हुकले

SCROLL FOR NEXT