Goa Politcs: काँग्रेसने 'गोवा रक्षण यात्रा' नव्हे, 'आमदार राखण यात्रा' काढावी; 'आप'चा खोचक सल्ला, पक्षांतरांवरून निशाणा

MLA Protection Yatra: राजस्थानमधील नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या निकालांचा दाखला देत आम आदमी पक्षाने काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला.
MLA Protection Yatra
Goa PolitcsDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: राजस्थानमधील नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या निकालांचा दाखला देत आम आदमी पक्षाने काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. काँग्रेसला दिलेले मत अखेरीस भाजपला मत देत असल्याचा दावा करत, आगामी गोवा विधानसभा निवडणुकीत मतदारांनी हीच स्थिती पुन्हा निर्माण करू नये, असे आवाहन ‘आप’ने केले.

गोवा विधानसभा निवडणुकीतही काँग्रेस निवडून आल्‍यास तेच होणार अशी भीती आपचे संघटन सचिव प्रशांत नाईक यांनी व्‍यक्‍त करताना, अशा परिस्‍थितीत आता काँग्रेसने ‘आमदार राखण यात्रा’ सुरू करावी, असा खोचक सल्‍ला दिला. राजस्थानमधील किमान तीन स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळाल्या असतानाही काँग्रेसच्या नगरसेवकांनी भाजपच्या उमेदवारांच्या बाजूने क्रॉस व्होटिंग केल्याने भाजपचे उमेदवार महापौर किंवा अध्यक्षपदी निवडून आले.

MLA Protection Yatra
Goa Politics: 'गोवा रक्षण यात्रेने फरक पडणार नाही'; 2027नंतरही भाजपचेच सरकार येणार, विश्वजीत राणेंचा दावा

अजमेर महानगरपालिकेत काँग्रेसला ३७, तर भाजपला ३२ जागा मिळाल्या. मात्र, काँग्रेस नगरसेवकांच्या मतांमुळे भाजपच्या अनामिका शर्मा ४३ मतांसह महापौरपदी निवडून आल्या. पाली महानगरपालिकेत काँग्रेसने २९ जागांसह आघाडी घेतली होती, तर भाजपला २१ जागा मिळाल्या. तरीही भाजपच्या नमिता बुबुकिया यांना ३३ मते मिळाली आणि त्या महापौरपदी निवडून आल्या.

कुचामन सिटी नगर परिषदेत काँग्रेसकडे १७, तर भाजपकडे १५ जागा होत्या. काँग्रेस आघाडीवर असूनही भाजपचे महेश रामचंद्र २५ मतांसह अध्यक्षपदी विराजमान झाले. याउलट, बारा नगर परिषदेत मतदारांनी ‘आप’ला स्पष्ट बहुमत देत ६० पैकी ३१ जागा दिल्या. आपच्या एकाही नगरसेवकाने पक्षाविरोधात मतदान केले नाही. त्यामुळे ‘आप’च्या शीतल राठोड यांची अध्यक्षपदी निवड झाली. आप गोवाचे संघटन सचिव प्रशांत नाईक काँग्रेसवर जोरदार टीका केली.

MLA Protection Yatra
Goa Rakshan Yatra: काँग्रेस कार्यकर्त्यांना 'ऊर्जा'; शेकडोंच्या उपस्थितीत 'गोवा रक्षण यात्रे'ला प्रारंभ, 40 मतदारसंघांत 27 दिवसांचा दौरा

‘सरकार स्थापनेची ताकद ‘गोवा फर्स्ट’मध्ये’

आप गोव्याचे वरिष्ठ उपाध्यक्ष संदेश तेलेकर देसाई म्हणाले, “काँग्रेसने आता ‘गोंय राखण यात्रा’ थांबवून ‘आमदार राखण यात्रा’ सुरू करावी, कारण त्यांची खरी समस्या स्वतःचे आमदार आणि नगरसेवक टिकवण्याची आहे. भाजपला पराभूत करून जनतेचे सरकार स्थापन करण्याची ताकद केवळ मजबूत आप आणि ‘गोवा फर्स्ट’मध्ये आहे.”

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com