Onion Market Price In Goa Dainik Gomantak
गोवा

Goa Vegetable Price: महिना झाला तरी कांद्याचा रुसवा जाईना

Goa Vegetable Price: प्रतिकिलो 70 रुपयांंनी विक्री : आवक वाढूनही दर कमी होईनात; भाजीपालाही महाग

दैनिक गोमन्तक

Goa Vegetable Price: बाजारात नव्या कांद्याच्या आवक वाढली असली तरी दरात घट होत नसल्याने याचा फटका सर्वसामान्यांच्या खिशाला बसत आहे. कांद्याची आवक घटल्याने घाऊक बाजारात 40 रुपये प्रतिकिलोने कांद्याची विक्री होत होती. मागील महिनाभरापासून किरकोळ बाजारात कांद्याच्या किमती 70 रुपये किलोपर्यंत गेल्या आहेत. आठवड्याभरापूर्वी कांदा 80 रुपये प्रतिकिलो दराने विकला जात होता.

राज्यात कांद्यासहित इतर जीवनावश्‍यक भाज्यांच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने सर्वसामान्य जनता महागाईने मेटाकुटीला आली आहे. राज्यात येणारा कांदा हा प्रामुख्याने बेळगाववरून येतो. मात्र, तेथील बाजारातच कांद्याच्या दरात वाढ झाल्याने तसेच गोव्यात आणल्या जाणाऱ्या कांद्याचा वाहतुकीचा खर्च आदी कारणांमुळे ७० रुपये प्रतिकिलो दराने कांदा विक्री करण्याशिवाय पर्याय नसल्याचे विक्रेते सांगतात. कांद्यासहित पालेभाज्या तसेच कडधान्यांच्या दरातही वाढ झाली आहे.

फलोत्पादनात कांदा 56 रु.

बाजारातील कांद्यापेक्षा फलोत्पादन महामंडळात मिळणारा कांदा 14ते 15 रुपये प्रतिकिलो स्वस्त असल्याने नागरिक मोठ्या प्रमाणात फलोत्पादन महामंडळातून खरेदी करत आहेत. घाऊक बाजारात इतर भाज्यांचे दर जास्त असल्याने नागरिकांचा कल फलोत्पादनाच्या गाळ्यांवरून भाजी विकत घेण्याकडे अधिक आहे.

फलोत्पादनाचे दर

(प्रतिकिलो रु.मध्ये)

  • भेंडी ४०

  • कोबी २०

  • गाजर ३६

  • हिरवी मिरची ४८

  • कांदा ५६

  • बटाटा २९

  • टोमॅटो ३२

बाजारातील भाज्यांचे दर

(प्रतिकिलो रु.मध्ये)

  • भेंडी ६०

  • कोबी ३०

  • गाजर ५०

  • हिरवी मिरची ६०

  • कांदा ७०

  • लिंबू ५ रुपये १

  • बटाटा ४०

  • टोमॅटो ४०

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Single Women: एकल महिलांना दया नव्हे, सन्मानाची गरज

AI Deepfake Content: डीपफेकच्या वाढत्या धोक्याविरोधात मोदी सरकार आक्रमक; सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्ससाठी नियम अत्यंत कडक

The Taxation Bill 2026: फ्री UPI पेमेंटचे दिवस आता संपणार? लोकसभेत गदारोळात नवीन टॅक्स बिल संमत; सामान्य नागरिकांच्या खिशावर होणार परिणाम?

दारुची नशा अन् एआयचा किळसवाणा खेळ! चालत्या ट्रेनमध्ये ChatGPT वर बुरखाधारी महिलेचा बनवला आक्षेपार्ह फोटो; भामटा पोलिसांच्या कचाट्यात VIDEO

Usha Nadkarni: पतीशी कोणतंही नातं नाही, मुलगा आई मानत नाही... 80 व्या वर्षीही एकट्याच आयुष्य जगतात उषा नाडकर्णी, वैयक्तिक आयुष्याबाबत मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT