Railway Mega Block: मडगाव ते कुमठा आणि राजापूर रोड ते सिंधुदुर्गदरम्यान 16 व 17 नोव्हेंबर रोजी असे दोन दिवस रेल्वेमार्गाची देखभाल व दुरुस्ती करण्यासाठी कोकण रेल्वेने तीन तास मेगा ब्लॉक जाहीर केला आहे. त्यामुळे खालील प्रवासी गाड्यांवर परिणाम होणार आहे.
मडगाव ते कुमठा मार्गावर 16 रोजी दुपारी 12 ते 3 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक जाहीर केले आहे. त्यामुळे त्या दिवशी ट्रेन क्रमांक 06602 मंगळुरू ते मडगाव रेल्वे कुमठापर्यंत येणार असून कुमठा ते मडगावदरम्यानचा प्रवास रद्द केला आहे. त्याचप्रमाणे ट्रेन क्रमांक 06601 क्रमांकाची मडगाव ते मंगळुरु प्रवासी गाडी कुमठाहून सुटणार असून मडगाव ते कुमठापर्यंतचा प्रवास रद्द केला आहे.
राजापूर रोड ते सिंधदुर्ग मार्गावर 17 नोव्हेंबर रोजी सकाळी 9.30 ते दुपारी 12 पर्यंत मेगा ब्लॉक जाहीर केले आहे, त्यामुळे ट्रेन क्रमांक 50108 ही मडगाव ते सावंतवाडी प्रवासी रेल्वे मडगावहून 80 मिनिटे उशिरा म्हणजे सकाळी 7.30 वाजता सुटणार आहे.
तसेच ट्रेन क्रमांक 10106 ही सावंतवाडी ते दिवा ही प्रवासी ट्रेन सकाळी 10.45 मिनिटांनी सुटेल.
ट्रेन क्रमांक 10104 मडगाव ते मुंबई सीएसटीएम मांडवी एक्स्प्रेसचे करमळी ते सावंतवाडी दरम्यान २० मिनिटांसाठी, ट्रेन क्रमांक 12051 मुंबई जनशताब्दीचे रत्नागिरी ते राजापूर दरम्यान 20 मिनिटांसाठी्. तसेच ट्रेन क्रमांक 22119 मुंबई सीएसएमटी ते मडगाव तेजस एक्स्प्रेसचे रत्नागिरी ते राजापूर दरम्यान 20 मिनिटांसाठी नियमन केले जाईल.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.