Goa Onion Price Today Dainik Gomantak
गोवा

Onion Price: कांद्याने आणले गृहिणींच्या डोळ्यांत पाणी; नवा कांदा 60, जुन्याचा दर 75 रुपये किलो

Goa Onion Price Hike: राज्यात गेल्या पंधरा दिवसांपासून कांद्याच्या दराने चांगलीच उसळी घेतली असून, नव्या कांद्याचा दर ६० रुपये, तर जुन्या कांद्याचा दर ७० ते ७५ रुपये किलोपर्यंत पोहोचला आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: राज्यात गेल्या पंधरा दिवसांपासून कांद्याच्या दराने चांगलीच उसळी घेतली असून, नव्या कांद्याचा दर ६० रुपये, तर जुन्या कांद्याचा दर ७० ते ७५ रुपये किलोपर्यंत पोहोचला आहे. ऐन महालय व सणासुदीच्या काळात कांदा महागल्याने सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघराचे बजेट कोलमडले आहे.

गोव्यात प्रामुख्याने बेळगावहून कांद्याची आवक होते. मात्र, बेळगावच्या घाऊक बाजारात मागणीच्या तुलनेत आवक कमी झाल्याने दर वाढले आहेत. सध्या कर्नाटकातील घाऊक बाजारात कांदा ५८ ते ६० रुपये किलो आहे. वाहतूक व अन्य खर्चामुळे गोव्यात किरकोळ दर ७० ते ७५ रुपयांवर पोहोचला आहे. दरम्यान, फलोत्पादन महामंडळाकडून बाजारभावापेक्षा कमी, ५७ रुपये किलो दराने कांद्याची विक्री केली जात आहे.

यंदा कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले नसल्याने आगामी काळात आवक वाढल्यानंतर दर स्थिर होण्याची शक्यता विक्रेत्यांनी व्यक्त केली आहे. मात्र, नवरात्रोत्सव काळात मागणी वाढल्यास दर काही काळ चढे राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे गृहिणींचे बजेट बिघडण्याची शक्यता आहे. आवक वाढल्यास काही प्रमाणात दरावर परिणाम होईल.

नवा कांदा महिन्यानंतर येणार!

यंदा मान्सून लांबल्याने नवीन कांदा बाजारात येण्यास सुमारे ३० ते ४५ दिवसांचा विलंब झाला आहे. त्यातच श्रावण, गणेशोत्सव आणि आगामी नवरात्रोत्सवामुळे शाकाहारी पदार्थांची मागणी वाढली आहे. नवीन खरिपाची आवकही कमी असल्याने पुरवठा साखळीवर परिणाम झाला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Water Crisis: राज्य गंभीर पाणी संकटाच्या दिशेने; सत्तरीतील नद्या सप्टेंबरमध्येच तळाला, 31 टक्के पावसाची तूट

Election Commission Form 6 Removed: झंझट संपली! फॉर्म-6 सोबत आता द्यावे लागणार नाही ॲडिशनल डिक्लेरेशन; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

Porvorim Traffic: उन्नत मार्ग सुरू, तरी कोंडी कायम; जोडमार्ग अपुरे, सायंकाळी पणजीत प्रवेश करताना वाहनचालकांची दमछाक

Goa Pedestrian Safety Audit: रस्ता सुरक्षेनंतर आता पादचारी सुरक्षा ऑडिट; जुन्या शिफारशी अपूर्ण, नव्या ऑडिटवर 2.2 कोटी खर्च

Goa SIR Voter Deletion: मतदार वगळल्याप्रकरणी निकाल; 'एसआयआर'मध्ये 'फॉर्म 8'चा पेच, गोवा खंडपीठाच्या निर्णयाकडे लक्ष

SCROLL FOR NEXT