Suicide News Dainik Gomantak
गोवा

Porvorim News: राहत्या घरी 41 वर्षीय महिलेची आत्महत्या; पर्वरी येथील घटना

3 महिन्यांपासून दीपा पोटाच्या आजाराने त्रस्त होत्या

Rajat Sawant

Porvorim Crime News: पर्वरी येथे एका 41 वर्षीय महिलेने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. दीपा मोरे असे मयत महिलेचे नाव असून 11 वर्षांपूर्वी त्यांचे लग्न झाले होते. गेल्या 3 महिन्यांपासून दीपा पोटाच्या आजाराने त्रस्त होत्या अशी माहिती पर्वरी पोलिसांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास पर्वरी येथे 41 वर्षीय दीपा मोरे यांनी राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली.

घटनेची माहिती मिळताच पर्वरी पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदन तपासणीसाठी रुग्णालयात पाठविण्यात आला.

चौकशीत असे समोर आले की, दीपा मोरे या गेल्या तीन महिन्यांपासून पोटाच्या आजारावर उपचार घेत होत्या. तसेच आजारपणामुळे त्या अस्वस्थ होत्या. दीपा यांचे 11 वर्षांपूर्वी लग्न झाले होते. त्यांचे पती टॅक्सी ड्रायव्हर आहेत. पीएसआय सीताराम मलिक पुढील तपास करीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT